शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका अधिकाºयांविरोधात सामाजिक कार्यकर्ते एकवटले : काम बंदला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 11:29 IST

  सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल कर्मचाºयांनी रविवारी काम बंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या ...

ठळक मुद्देनागरिकांना वेठीस धरणाºयांवर गुन्हे दाखलची मागणीअत्यावश्यक व स्वच्छतेची सेवा बंद केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाच्या तरतुदीचा भंग केल्याबद्दल सर्व अधिकाºयांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे

 

सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल कर्मचाºयांनी रविवारी काम बंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या आंदोलनाविरोधात शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. नागरिकांना वेठीस धरणाºया महापालिका अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. 

आयुक्त व आरोग्य विभागाकडील कर्मचाºयांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल अधिकारी व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे रविवारी शहरातील कचरा उठाव झाला नाही. मुख्य बाजारपेठेसह शहरात दुर्गंधी पसरली होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकीला सतीश साखळकर, सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, नागरिक हक्क संघटनेचे वि. द. बर्वे, अमर निंबाळकर, मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण, केमिस्ट असोसिएशनचे रवींद्र वळवळे, उमेश देशमुख, शिवसेनेचे शंभोराज काटकर, आसीफ बावा, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील, दिलीप गायकवाड, सुधीर भोसले, आयुब पटेल, आशिष कोरी, युसूफ मेस्त्री उपस्थित होते. बैठकीत महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक व स्वच्छता सेवा बंद ठेवल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

बैठकीबाबत साखळकर म्हणाले की, महापालिका प्रशासनाने नागरिकांना आरोग्य स्वच्छता ही सेवा पुरविणे बंधनकारक आहे. महापालिका क्षेत्रात साथीच्या रोगांचा फैलाव होत असताना स्वच्छता सेवा बंद केल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर होणार आहेत. डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुन्या यासारख्या आजारांनी कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही प्रशासन सार्वजनिक आरोग्याबाबत गंभीर नसून भारतीय दंड संहिता कलम १६६ नुसार आयुक्त, उपायुक्त व कर्मचारी हे गुन्ह्यास पात्र आहेत. अत्यावश्यक व स्वच्छतेची सेवा बंद केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाच्या तरतुदीचा भंग केल्याबद्दल सर्व अधिकाºयांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन पाठविले आहे. नगरविकास विभागाकडे तक्रार करणारमहापालिका क्षेत्रात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही महापालिका प्रशासन सुस्त आहे. रविवारी अधिकारी व कर्मचाºयांनी अत्यावश्यक सेवा बंद ठेवल्या. स्वच्छता झाली नाही. शनिवारच्या बाजारातील कचरा मुख्य बाजारपेठेत पडून राहिला. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमातील तरतुदीचा भंग झाला आहे. त्यामुळे आयुक्तांसह सर्व अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई व्हावी, यासाठी नगरविकासचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देणार असल्याचे साखळकर म्हणाले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीcommissionerआयुक्त