शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

संजयकाका-पृथ्वीराजबाबा गटात ‘सोशल’ वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:35 IST

सांगली : निवडणूक काळात शांत झालेला भाजपातील अंतर्गत वाद मतदानानंतर पुन्हा उफाळून आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि ...

सांगली : निवडणूक काळात शांत झालेला भाजपातील अंतर्गत वाद मतदानानंतर पुन्हा उफाळून आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजयकाका पाटील गटातील काही कार्यकर्त्यांनी एका व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपवर एकमेकांवर चिखलफेक करीत वादाला तोंड फोडले. या प्रकाराने पक्षातील अन्य कार्यकर्ते अवाक् झाले आहेत.संजयकाका पाटील आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यातील संघर्ष जुना असला तरी, निवडणुकीच्या काळात हा वाद बाजूला ठेवून ते एकत्र आले होते. प्रचार सभा आणि बैठकांमध्ये त्यांनी एकत्रितपणे काम केले आहे. त्यामुळे निवडणूक काळात कुठेही त्यांचे कार्यकर्ते, समर्थकांमध्येही संघर्ष दिसत नव्हता. मतदान झाल्यानंतर मात्र या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आमने-सामने आले. भाजपशी संबंधित प्रमुख कार्यकर्त्यांचा एक व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर गुरुवारी राजकीय पोस्ट पडत होत्या. चर्चांनाही सुरुवात झाली होती. दरम्यान, देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले नसल्याचा आरोप खासदार गटातील एका कार्यकर्त्याने केला. त्यावरून देशमुख व खासदार गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली. दोघांच्याही वादात रस नसणाऱ्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हा प्रकार खटकला. काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.सांगली जिल्ह्यातील भाजपअंतर्गत वाद निवडणुकीपूर्वी विकोपाला गेला होता. पक्षांतर्गत गटबाजी वाढल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत याबाबत बैठक घेतली होती. या बैठकीस जिल्ह्यातील पक्षाचे आमदार, प्रमुख पदाधिकारी यांना बोलाविण्यात आले होते. त्याठिकाणी पक्षांतर्गत वादावर पडदा टाकण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नेते एकसंधपणे निवडणुकीत काम करताना निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण होणार नाहीत, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत होता. गुरुवारी सोशल मीडियावरील वादावादीच्या घटनेने त्यांना धक्का बसला.सांगली लोकसभा मतदारसंघातील निकालाविषयी बरेच तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपमध्येही यावरून चर्चांना उधाण आले आहे. अशाच उधाणलेल्या चर्चांमधून वादावादीसही सुरुवात झाली आहे. सामान्य कार्यकर्त्यांमधील वादावादीचे हे प्रकार पक्षासाठी भविष्यात डोकेदुखीचे ठरू शकतात. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व नेत्यांनीही या गोष्टीची दखल घेत संबंधित कार्यकर्त्यांना शांत बसण्याची सूचना दिल्याचे समजते.चर्चेला फुटले पाय; कार्यकर्ते गप्पचएका ग्रुपवर झालेल्या वादामुळे त्याची चर्चा अन्य ग्रुपवरही रंगली होती. चर्चेला पाय फुटून ती कार्यकर्त्यांमध्ये येऊन पोहोचली. सांगली, मिरजेतील कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादावादीच्या प्रकारावरून चर्चा सुरू होत्या. काही प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर, त्यांनी याविषयी काहीही सांगण्यास नकार दिला.जुन्या-नव्यांचाही पक्षातील वाद कायमभाजपमध्ये जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा वादही कायम आहे. निवडणुकीत तो शांत असला तरी, भविष्यात यावरून पुन्हा नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन नव्याने आलेल्या लोकांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वाचा फोडली होती.