शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

..तर गाडी कधी पंक्चर होईल सांगता येणार नाही, मंत्री नितीन गडकरींचा उद्योजकांना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 14:20 IST

भिलवडी स्टेशन (ता. पलूस) येथे चितळे डेअरी आणि जगातील सर्वांत मोठ्या जेनेटिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात आलेल्या सेक्सेल सिमेन प्रयोगशाळेच्या उद्घाटन

भिलवडी : सरकारी अनुदानावर अवलंबून राहून कोणताही धंदा किंवा व्यापार करायचा ठरविल्यास गाडी कधी पंक्चर होईल सांगता येणार नाही. सरकारवर अवलंबून न राहता विज्ञान - तंत्रज्ञानाचा वापर, कमीत कमी उत्पादन खर्च, जास्तीत जास्त उत्पादन व भविष्याचा वेध घेण्याची क्षमता ओळखून चितळे डेअरीने केलेली क्रांती कृषी व दुग्ध क्षेत्राला दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.भिलवडी स्टेशन (ता. पलूस) येथे चितळे डेअरी आणि जगातील सर्वांत मोठ्या जेनेटिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात आलेल्या सेक्सेल सिमेन प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार होते.गडकरी म्हणाले की, देशाचा आर्थिक विकास दर उंचावण्यासाठी शेती व दुग्ध व्यवसायामध्ये क्रांतिकारक बदल होणे आवश्यक आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहून कोणताही धंदा किंवा व्यापार करायचा ठरविल्यास गाडी कधी पंक्चर होईल, हे सांगता येणार नाही. महिला सक्षमीकरणामुळे सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात विदर्भ - मराठवाड्यापेक्षा जादा कृषी - दुग्ध उत्पादन होत आहे. दूध वाढीसाठी देशभर दर्जेदार सिमेन उपलब्ध करून द्यावे लागेल. कमी खर्चात जादा प्रोटीन देणाऱ्या गवताची निर्मिती करावी लागेल. दुधाचे उत्पादन वाढले तरीही खर्च कमी कसा होईल, यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील.

या उपक्रमासाठी भविष्यात केंद्र सरकारकडून चितळे डेअरीस लागेल ती मदत दिली जाईल.खा. पवार म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ब्रिटिशांकडे धोरणात्मक व क्रांतिकारी मागण्या केल्या होत्या. त्या वास्तवात आणण्याचे काम चितळे परिवाराने पूर्ण केले आहे. जी. एम. बियाण्यांचा वापर केल्यास देश अन्नधान्य उत्पादनात समृध्द बनेल. जी. एम. व्हरायटी न वापरण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. त्याविरोधात केंद्र सरकारने पुन्हा न्यायालयात जावे.यावेळी नानासाहेब चितळे, विश्वास चितळे, श्रीपाद चितळे, अनंत चितळे, गिरीश चितळे, मकरंद चितळे, पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजय पाटील, आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, आ. सुधीर गाडगीळ, आ. मोहनराव कदम, आ. सुमनताई पाटील, आ. अनिल बाबर, आ. मानसिंगराव नाईक, आ. विक्रम सावंत, आ. अरुण लाड, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.

गडकरी, पवार एकाच गाडीतून

नितीन गडकरी, शरद पवार, जयंत पाटील, श्रीनिवास पाटील, विश्वजित कदम आदींनी इलेक्ट्रिक मोटारीत बसून सिमेन प्रयोगशाळेतील विविध विभागांची तसेच वळूंची पाहणी केली.

टॅग्स :SangliसांगलीNitin Gadkariनितीन गडकरी