शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँकेच्या अवसायकपदावरून स्मृती पाटील यांना हटविले, उर्मिला राजमाने यांच्याकडे बँकेची सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 16:17 IST

काही ठेवीदारांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊनच स्मृती पाटील यांना अवसायक पदावरून हटविल्याची चर्चा

सांगली : येथील वसंतदादा बँकेच्या अवसायक स्मृती पाटील यांची महापालिका उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे स्मृती पाटील यांना बँकेच्या अवसायक पदावरून सहकार विभागाने हटविले आहे. शासनाने सहायक निबंधक उर्मिला राजमाने यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली असून सोमवारी त्यांनी बँकेचा पदभारही स्वीकारला आहे.स्मृती पाटील यांच्याकडे वसंतदादा बॅँकेच्या अवसायकपदाची जबाबदारी शासनाने दिली होती. त्यांनी पुन्हा महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येण्याचे प्रयत्न चालवले होते. त्यात त्यांना यशही आले. मात्र, उपायुक्त राहुल रोकडे यांनीही त्यांच्या महापालिकेतील प्रतिनियुक्तीला दोन वर्षांची मुदतवाढ घेण्यात यश मिळविले. त्यामुळे पाटील यांचे महापालिकेच्या मुख्यालयात उपायुक्त होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मिरजेतील उपायुक्त पदाचा प्रभारी पदभार नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्याकडे होता. आडके यांच्याकडील हा पदभार काढून तेथे पाटील यांना रुजू करण्यासाठी प्रयत्न झाले. महापालिका पदाधिकारी व आयुक्तांना वसंतदादा बॅँकेच्या अवसायकाचा पदभार माझ्याकडेच असल्याने महापालिकेच्या बॅँकेत अडकलेल्या ४० कोटींच्या ठेवी परत करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही दिली होती. मार्च २०२३ अखेर ५ कोटी रुपये परत करण्याचा स्मृती पाटील यांनी शब्द दिल्याचे स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी जाहीरपणे सांगितले.आडके यांच्याकडील मिरज उपायुक्तांचा प्रभारी पदभार काढून घेऊन तेथे स्मृती पाटील यांची वर्णी लावली. पाटील यांनी वसंतदादा बँकेतील ठेवीदारांच्या एकूण ठेवी पैकी ५ टक्के ठेवी परत करण्याबाबत सहकार आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला. मात्र, पाटील यांनी महापालिकेला ठेवी परत करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात काही ठेवीदारांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊनच स्मृती पाटील यांना अवसायक पदावरून हटविल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी उर्मिला राजमाने यांची नियुक्ती केली. राजमाने यांनी यापूर्वी वसंतदादा बॅँकेच्या अवसायक मंडळात सहा वर्षे कामही केले आहे.देणे १५९ कोटी...येणे १४७ कोटीवसंतदादा बॅँकेत ८८ हजार ठेवीदारांना १५९ कोटींच्या ठेवी परत करायच्या आहेत. यात सांगली, पुणे, मुंबईसह ३५ शाखांतील ठेवीदारांचा समावेश आहे. बॅँकेकडे सध्या कर्ज वसुलीतील आठ कोटी रुपयेच शिल्लक आहेत; पण ठेवीदारांचे देणे १५९ कोटी रुपये आहे. बॅँकेच्या २५०० कर्जदारांकडून १४७ कोटी रुपयांची कर्जवसुली बाकी आहे. ही व्याजासह रक्कम वसुलीचे नूतन अवसायकांसमोर मोठे आव्हान आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक