विटा : महाराष्टÑीयन झांज, लेझीम पथक, ढोल-ताशा, लष्कराचा बॅन्ड आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ शहरातील विश्वविद्यालयाचे आवार शिवजयंतीच्या निमित्ताने शिवमय झाले. सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त त्या राज्याच्या कानाकोपऱ्यात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांच्या पुढाकाराने साज-या झालेल्या शिवजयंतीवेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा घुमला.
सांगली जिल्'ातील खानापूर, आटपाडी, मिरज, जत, तासगाव यासह विविध तालुक्यांतील मराठी बांधव सोने-चांदी व्यवसायानिमित्त उत्तर प्रदेशात स्थायिक झाले आहेत. बुधवारी शिवजयंतीचे औचित्य साधून तेथील विविध जिल्'ात असलेले हे मराठी बांधव एकत्रित आले. त्यावेळी छत्रपतींच्या पुतळ्याची लखनौ शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवेळी मराठी बांधव व गृहिणींनी घातलेले भगवे फेटे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. झांज, ढोल-ताशा, लेझीम पथक आणि या कार्यक्रमासाठी आलेला लष्कराचा खास बॅन्ड यामुळे मिरवणूक लक्षवेधी ठरली. महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
उत्तर प्रदेश मराठी समाजाचे संस्थापक-अध्यक्ष उमेशकुमार पाटील यांच्यासह मराठी बांधवांच्या संयोजनाखाली लखनौ विश्वविद्यालयाच्या पटांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांच्याहस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंत्री महेंद्र सिंह, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, भातखंडे संगीत विद्यापीठाच्या कुलपती श्रुती सडोलीकर, श्रीहरी बोरीकर, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. अलोक रॉय, रंजीत सावकर तसेच पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी हजेरी लावली होती.वश्वनाथ देवकर, गजानन माने, आप्पा चव्हाण, सुनील पाटील, भानुदास पाटील, सागर यादव उपस्थित होते.