शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईत जप्त केलेल्या जनावरांची गोशाळांकडूनच कत्तल, पांजरपोळसाठी सुधारित नियमावली जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:22 IST

कारवाईमध्ये जप्त केलेल्या जनावरांचे टॅगिंग करण्याचे महत्त्वाचे आदेश शासनाने दिले

संतोष भिसेसांगली : कत्तलीसाठी नेण्यात येत असलेले पशू व गोवंशातील जनावरे सुटकेनंतर गोशाळा व पांजरपोळमध्ये ठेवण्यात येतात. पण, राज्यातील काही गोशाळांकडूनच जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या विकले जात असल्याच्या घटना शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे नवी नियमावली जारी केली असून, अधिक कडक तरतुदी लागू केल्या आहेत.राज्यात गोवंशाची बेकायदा वाहतूक व कत्तलीला बंदी आहे, तरीही गोवंश हत्येच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. काही प्राणीप्रेमी व गोसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून पशुंची सुटका केली जाते. गुन्हे दाखल होऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर ही जनावरे अधिकृत गोशाळा किंवा पांजरपोळमध्ये दाखल केली जातात. पण या गोशाळांकडूनही जनावरांना पुन्हा कत्तलीसाठी दिले जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे दाखल झाल्या आहेत. या अमानवी आणि धक्कादायक कृत्यांना आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शुक्रवारी (दि. ४) नव्याने नियमावली जारी केली.कायदेशीर कारवाईत ताब्यात घेतलेल्या जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून त्याच दिवशी तसा दाखला घ्यायचा आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय कोणत्याही जनावराला गोशाळेकडे सुपुर्द करण्यास प्रतिबंध आहे. गोशाळेकडे जनावरे हस्तांतरित करण्यापूर्वी पशुसंवर्धन उपायुक्त किंवा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या सचिवाची लेखी संमती सक्तीची आहे. संबंधित गोशाळा किंवा पांजरपोळमध्ये पुरेशा सुविधा असाव्यात. गोशाळा चालकांविरोधात पशुसोबत क्रूर वागणुकीचे गुन्हे दाखल नसावेत.

जप्त जनावरांची नोंद पोलिसांत करावी. पशुसंवर्धन उपायुक्तांच्या परवानगीशिवाय जनावरांचे हस्तांतरण करता येणार नाही, शिवाय शेतकऱ्यांना विक्रीही करता येणार नाही. त्यांना वापरासाठीही देता येणार नाही. गोशाळेत किंवा पांजरपोळमध्ये जनावराचा मृत्यू झाल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र सक्तीचे आहे. प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या मासिक बैठकीत या जनावरांविषयी आढावा घ्यायचा आहे.जनावरांचे टॅगिंग होणारकारवाईमध्ये जप्त केलेल्या जनावरांचे टॅगिंग करण्याचे महत्त्वाचे आदेश शासनाने दिले आहेत. तसेच त्यांच्या नोंदी इनाफ प्रणालीमध्ये करायच्या आहेत. टॅगिंगमुळे जनावरांच्या स्थलांतराला, हस्तांतराला आळा बसणार आहे. गोशाळांमधील गैरकृत्यांवर लक्ष राहणार आहे.

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकSangliसांगली