शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सोळाशे किलो रोट्या अन् ७५० किलो वांग्यांच्या भाजीची महापंगत, सांगलीतील घोटी खुर्दमध्ये तुकाराम बीजोत्सव उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 12:10 IST

चार पिढ्यांची अखंड परंपरा : भाविकांनी लुटला शाकाहारी यात्रेचा आनंद

दिलीप मोहितेविटा : मुखी हरिनामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या निनादावर दहा ते बारा हजारांहून अधिक रोट्या तयार करीत सांगली जिल्ह्यातील घोटी खुर्द (ता. खानापूर) येथे बुधवारी तुकाराम बीजोत्सव साजरा करण्यात आला.सुमारे एक हजार ६०० किलो पीठाच्या रोट्या अन् पाऊण टन म्हणजेच ७५० किलो वांग्यांच्या भाजीवर ताव मारत हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला. घोटी खुर्द येथील ग्रामदैवत श्री राजूबुवा यांची समाधी असलेल्या या गावात दरवर्षी तुकाराम बीजोत्सव साजरा केला जातो. तत्पूर्वी आठवडाभर अगोदर भजन-कीर्तन, प्रवचनाचा सप्ताह असतो. या सप्ताहाची सांगता होळी दिवशी केली जाते. गेल्या चार पिढ्यांपासूनची ही परंपरा घोटीकर ग्रामस्थांनी आजही जोपासली आहे. त्यानंतर तुकाराम बीजेदिवशी दुपारी १२ वाजता संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी झाल्यानंतर ‘वांगे-रोटी’ हा महाप्रसाद होतो. तुकाराम बीजेदिवशी सकाळी गावातील सर्व कुटुंबातील महिला एकत्रित येऊन मंदिराच्या पटांगणात तीन दगडांची चूल मांडून हरिनामाचा गजर व त्याला अभंगाची जोड देत रोट्या बनविण्यास सुरुवात करतात. दहा हजारांहून अधिक रोट्या बनविल्या जातात. प्रत्येक कुटुंबातील महिला या सोहळ्यात सहभागी होतात.एकाद्या कुटुंबातील महिला आली नाही तर दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबातील प्रमुखाकडून दंडाची रक्कम वसूल केली जाते, हे या यात्रेतील संघटनकौशल्याचे खास वैशिष्ट्य आहे. पुरुष मंडळींना वांग्याची भाजी तयार करण्याचे, तर काही पुरुषांना पाणी भरण्याचे काम दिले जाते. ग्रामदैवत राजूबुवा मंदिराच्या परिसरात मोठ्या काहिलीत वांग्याची पातळ भाजी तयार केली जाते. पुरुष मंडळी रोट्या एकत्रित करतात. त्यानंतर भाविकांना वांगे-रोटीचा महाप्रसाद दिला जातो. हा महाप्रसाद घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी घोटी खुर्द येथे बुधवारी गर्दी केली होती.

कीर्तन-प्रवचन कार्यक्रमांचा आनंदसध्या यात्रा म्हटले की, तमाशा, ॲार्केस्ट्रा, लावण्या, आदी मनोरंजनाच्या कार्यक्रमाची रेलचेल असते. परंतु, घोटी खुर्दला कीर्तन-प्रवचनाद्वारे यात्रा साजरी केली जाते. ही परंपरा गावकऱ्यांनी आजही कायम जोपासली आहे.

टॅग्स :Sangliसांगली