शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

सांगली महापालिका प्रसुतिगृहातून सहा खाटा झाल्या गायब : संतापजनक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:36 IST

महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे

ठळक मुद्देनगरसेवक थोरात यांच्या प्रयत्नामुळे खाटांचा शोध

सांगली : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या खाटांचा शोध सुरू केला. आमराई, कुपवाडमधील कार्यालयांसह अन्य ठिकाणी या खाटा आढळून आल्याने संतप्त झालेल्या थोरात यांनी प्रशासनाला धारेवर धरत या खाटा पुन्हा प्रसुतिगृहात हलविण्यास भाग पाडले.

महापालिकेच्या प्रसुतिगृहातील तीन खाटा आमराईतील विश्रामधाममध्ये लेखापरीक्षणासाठी आलेल्या लेखापरीक्षकांना देण्यात आल्या होत्या. त्या खाटा तीन वर्षांपासून तेथे होत्या. दोन खाटा निवडणुकीदरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी अन्य विभागांकडे हलविल्या होत्या. एक खाट महिला बालकल्याण विभागाकडे देण्यात आली होती. यामुळे रुग्णालयात खाटांअभावी रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत होते.

याबाबत थोरात म्हणाले, सांगलीच्या प्रसुतिगृहाचे कामकाज केवळ दहाजणांवर सुरू आहे. या रुग्णालयात दोन प्रसुती विभाग तज्ज्ञ आहेत. मिरजेत तर तज्ज्ञही नाहीत. दोन्ही ठिकाणची आॅपरेशन थिएटर धूळ खात पडली आहेत. मिरजेतील आॅपरेशन थिएटरवरील पत्रे गायब आहेत. तेथे जाळी बसविण्यात आली आहे. औषधांचाही पुरवठा व्यवस्थित केला जात नाही. त्यात प्रसुतिगृहातील खाटाच गायब करण्याचा प्रकार प्रशासनाकडून झाला आहे. ही बाब निदर्शनास येताच डॉ. कवठेकर, डॉ. सुनील आंबोळे, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांना घेऊनच गायब खाटांची शोधमोहीम सुरू केली. या खाटा आमराई, कुपवाड येथून कुलपे तोडून महापालिकेच्या रुग्णवाहिकेद्वारे परत आणल्या. रुग्णालयातील खाटा गायब होणे, हा प्रकार लाजिरवाणा आहे. आरोग्य विभागाचा असा कारभार खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला....तर राष्ट्रवादी रुग्णालये चालवेलमहापालिकेची रुग्णालये, प्रसुुतिगृहाची अवस्था दयनीय आहे. आयुक्त, महापौरांनीही तात्काळ लक्ष घालून तिथे सोयी-सुविधा द्याव्यात. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून जर महापालिकेला रुग्णालये चालवायला जमत नसेल तर, तसे सांगावे. राष्ट्रवादी काँग्रेस दरवर्षी महापालिका क्षेत्रातील ५० हजारहून अधिक लोकांना शिबिराद्वारे आरोग्य सुविधा देते. महापालिकेला जमत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस ही रुग्णालये चालविण्यास समर्थ आहे, असेही योगेंद्र थोरात म्हणाले. 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका