शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

By हणमंत पाटील | Updated: May 29, 2024 09:37 IST

एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हणमंत पाटील, दत्ता पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, तासगाव (जि. सांगली ) : नातीचा वाढदिवस करून तासगावच्या दिशेने  माघारी येत असताना तासगाव- मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत चालकाचा ताबा सुटून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबीय समवेत कारमधून (एमएच 10 एएन 1497) कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस संपवल्यानंतर नात- लेकीसह कुटुंबीयासमवेत माघारी तासगावला येत होते. तासगाव जवळ आल्यानंतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्याजवळ चालक राजेंद्र पाटील यांचा वाहनावरचा ताबा सुटल्याने गाडी थेट कालव्यातकोसळली.

या अपघातात गाडीतील राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 56), त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (वय 52), रा. तासगाव, मुलगी प्रियंका अवधूत खराडे (वय 33), नात दुर्वा अवधूत खराडे (वय 5),  दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे ( वय 1), सर्व रा. बुधगाव आणि राजवी विकास भोसले (वय 2) रा. कोकळे यांचा जागीच मृत्यू झाला.  तर पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तासगाव पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात नेले. 

राजवीचा वाढदिवस ठरला अखेरचाच -

राजवीचा दुसरा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मात्र वाढदिवस संपवून सुट्टीसाठी आजोबांच्या समवेत आजोळी जात असतानाच काळाने घाला घातला. त्यामुळे राजवीचा हा अखेरचा वाढदिवस ठरला असून पाटील कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली आहे या घटनेने तासगाव शहरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात