शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे सहा किलोचे ओझे दीड किलोवर!

By admin | Updated: February 11, 2016 23:33 IST

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम : सहा हजार विद्यार्थ्यांची झाली ओझ्यातून सुटका, उपक्रमाचे सर्वत्र कौतुक -- गुड न्यूज

सांगली : राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पावले टाकली आहेत. त्याला प्रतिसाद देत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची या ओझ्यातून सुटका केली. लठ्ठे सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पाटील व संस्थेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी नियोजनबद्धरित्या सहा किलो दप्तराचे ओझे दीड किलोवर आणले आहे. संस्थेच्या सहा हजार विद्यार्थ्यांची या ओझ्यातून सुटका केली आहे. सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकात लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या शाळा आहेत. अध्यक्ष सुरेश पाटील यांनी संस्थेच्या विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली. त्यात शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याच्यादृष्टीने पावले टाकली आहेत. या उपक्रमाला प्रतिसाद देत संस्थेमधील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ओझे कसे कमी करता येईल, यावर विविध स्तरावर चर्चा झाली. बालमानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला. शाळेत एकादिवशी विविध विषयांचे तास घेतले जात होते. किमान सहा ते सात विषयांची पुस्तके, वह्या, स्वाध्यायपुस्तके आदींचे दप्तर विद्यार्थ्यांना दररोज घेऊन यावे लागते. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेचे वेळापत्रकच बदलण्यात आले. एकादिवशी एका विषयाचे दोन तास ठेवण्यात आले. त्यामुळे दररोज केवळ तीन ते चार विषयांच्याच तासाचे नियोजन झाले. तीन भाषा विषयांसाठी एक वही, विज्ञान व गणितासाठी एक वही व समाजशास्त्रासाठी एक वही, अशा तीनच वह्या विद्यार्थ्यांकडे असतील, याची दक्षता घेतली. शाळेतील स्वाध्यायची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र दिवस निश्चित करण्यात आला. परिणामी दररोज स्वाध्यायच्या वह्या आणण्याची आवश्यकताच उरली नाही. खासगी शिकवणीच्या वह्यांना दप्तरात बंदी घातली. दप्तर आणण्यासाठी सॅकऐवजी कमी वजनाच्या टिकाऊ बॅगा तयार करून त्या विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. एका बेंचवरील दोन विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या पुस्तकांची विभागणी केली. त्यामुळे एका विद्यार्थ्यास एकच पुस्तक आणावे लागते. शाळेतच शुद्ध पाण्याची सोय करून पाण्याच्या छोट्या रिकाम्या बाटल्या आणण्याची सक्तीही केली. परिणामी विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे सहा किलोवरून दीड किलोपर्यंत कमी झाले आहे. संस्थेच्या सांगली हायस्कूल, राजमती हायस्कूल, पॅ्रक्टिसिंग स्कूल, दत्तवाड, जयसिंगपूर शाळेतही उपक्रम सुरू आहे. (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करून त्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे व पूर्णक्षमतेने विद्यार्थ्यांनी अध्ययन प्रक्रियेत सहभागी व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा होता. पालकांशी चर्चा करून त्यांची लेखी संमती घेऊन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. - सुरेश पाटील, अध्यक्ष लठ्ठे एज्युकेशन सोसायटीसंस्थेने विद्यार्थ्यांसाठी असा राबविला उपक्रमविद्यार्थ्यांच्या शालेय वेळापत्रकात बदलएकाचदिवशी एका विषयाचे दोनच तासतीन भाषांसाठी एक वही, गणित विज्ञानसाठी एक वही व समाजशास्त्रासाठी एक वहीस्वाध्याय पुस्तिकांच्या तपासणीसाठी स्वतंत्र दिवसाची निश्चितीसॅकऐवजी कमी वजनाच्या बॅगेचा वापरदोन विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या पुस्तकांची विभागणी