शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

MPSC EXAM: लेखनिकची रिसिट मिळाली, पण यादीत नावच नाही; दृष्टीहीन विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 16:42 IST

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शासकीय यंत्रणाच असावी, असा सूर परीक्षा देणाऱ्या काही सामान्य विद्यार्थ्यांमधून उमटला.

सांगली : जिल्ह्यातील दृष्टीहीन असलेल्या सहा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्यांना लेखनिकचा उल्लेख असलेली रिसिट मिळाली, त्यामुळे ते थेट परीक्षेला गेले. मात्र, प्रपत्र न भरल्याने त्यांचे परिक्षार्थींच्या यादीत नावच आले नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्वपरीक्षा शनिवारी जिल्ह्यात विविध केंद्रांवर पार पडली. यात दिव्यांगांसह काही दृष्टीहीन विद्यार्थ्यांनीही अर्ज भरले होते. त्यांना ऑनलाईन रिसिटही मिळाली. त्यामुळे ते थेट परीक्षेला गेले, मात्र लेखनिक (रायटर) असलेल्या यादीत त्यांचे नावच नसल्याने या सहाजणांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला नाही.ते हताश होऊन तासभर तिथेच थांबले. परीक्षा संपल्यानंतर सांगलीच्या एका केंद्र निरीक्षकाने त्या दृष्टीहीन विद्यार्थीना बोलावून प्रपत्र भरल्याबाबत विचारणा केली. असे आणखी एक स्वतंत्र प्रपत्र भरायचे असते, याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. काही दिव्यांग परिक्षार्थींनी असे प्रपत्र भरल्यामुळे त्यांचे यादीत नाव आले होते, मात्र या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना त्याची कल्पना नव्हती.वास्तविक याबाबतची कल्पना आयोगानेच मेलद्वारे द्यायला हवी. दुसऱ्याच्या मदतीशिवाय काही करता येत नसलेल्या या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना कुठेही याबाबतचे मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे परीक्षेची तयारी करुनही एका फॉर्मची कल्पना नसल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले.प्रपत्र भरले नसल्याने हा गोंधळ झाल्याचे संबंधित परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेवटी खापर दृष्टीहीन विद्यार्थ्यांवरच फुटले. ज्यांना दृष्टी आहे अशा लोकांना अनेक ठिकाणी जाऊन चौकशी करुन नियमानुसार अर्ज दाखल करता येऊ शकतात, मात्र दृष्टीहीन विद्यार्थ्यांना असे करणे कठीण असते. त्यामुळे त्यांना मदत करणारी शासकीय यंत्रणाच असावी, असा सूर परीक्षा देणाऱ्या काही सामान्य विद्यार्थ्यांमधून उमटला.

टॅग्स :SangliसांगलीMPSC examएमपीएससी परीक्षा