शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील तंतूवाद्यांना केंद्र शासनाचे जीआय मानांकन प्रदान, देशात व परदेशात निर्यातीसाठी फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:20 IST

तीन वर्षांच्या पाठपुराव्यास यश

मिरज : मिरजेतील सतार व तानपुरा या तंतूवाद्यांना केंद्र शासनाकडून जीआय (भौगोलिक ओळख) मानांकन मिळाले आहे. नाबार्डतर्फे मुंबईत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते मिरज सितार व मिरज तानपुरा या वाद्यांना जिओग्राफिकल इंडिकेशन (जी. आय.) मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले.मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंटस् क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर व सोलट्युन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष मुबिन मिरजकर, अल्ताफ पिरजादे, सर्फराज शहापुरे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व नेते राजेश टोपे उपस्थित होते.दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतूवाद्यांना प्रथमच भौगोलिक ओळख मिळाली आहे. मिरजेत तयार होणाऱ्या तंतूवाद्यांना जीआय मानांकन मिळाल्याने या तंतूवाद्यांची आता इतरांना नक्कल करता येणार नाही. इतर ठिकाणची वाद्ये मिरजेच्या नावाने विक्री करता येणार नाहीत. यामुळे मिरजेतील तंतूवाद्यांना देशात व परदेशात निर्यातीसाठी फायदा होऊन येथील तंतूवाद्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे.

तीन वर्षांच्या पाठपुराव्यास यशभारतीय शास्त्रीय संगीतात मिरजेत तयार होणाऱ्या तंतूवाद्यांचीही मोठी भूमिका आहे. या तंतूवाद्यनिर्मिती कलेला भौगोलिक ओळख मिळवण्यासाठी गेली तीन वर्षे प्रयत्न सुरू होते. मिरजेत दोनशे वर्षांपासून तंतूवाद्य निर्मिती सुरू असल्याच्या ऐतिहासिक कागदपत्रांची पडताळणीही यासाठी करण्यात आली. सतार व तंबोऱ्याला जीआय नामांकन मिळाल्याने यापुढील काळात मिरजेत तयार होणाऱ्या इतर वाद्यांनाही मानांकनासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ तंतूवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले.