शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:38 IST

दोन्ही पक्षांचे, नेत्यांचे सांगलीशी जवळचे संबंध असल्यामुळे जिल्ह्यातील एखादी जागा मिळावी, म्हणून ते प्रयत्नशील आहेत. शिवसेना, भाजपमध्येच जिल्ह्यातील जागावाटप झाले, तर घटकपक्षांच्या नाराजीचा सामना युतीला करावा लागू शकतो.

ठळक मुद्देदोन्ही पक्षांना किमान एका तरी जागेची अपेक्षा आहे.

अविनाश कोळी ।सांगली : गेल्या पाच वर्षात भाजप, शिवसेनेत झालेली मोठी भरती, घटकपक्षांकडून जागेसाठी होत असलेला आग्रह आणि इच्छुकांची प्रचंड गर्दी यामुळे उमेदवारी वाटपावेळी महायुतीत नाराजीनाट्य रंगण्याची दाट शक्यता आहे. गत विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढूनही प्रत्येक पक्षाने बंडखोरीचा अनुभव घेतला होता. आता आघाडी, महायुतीमुळे नाराजीचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागू शकतो.

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील लढती लक्षवेधी होणार आहेत. बहुतांश मतदारसंघात तिरंगी व काही ठिकाणी नाराजीतून चौरंगी, पंचरंगी निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व मोठ्या पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी, मनसे व अपक्षांच्या गर्दीत बहुरंगी लढती झाल्या होत्या. यंदा तशी परिस्थिती नाही. आघाडी आणि महायुतीचा सामना रंगत असताना, काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे.

मात्र महायुतीला सर्वाधिक नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आठपैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत. या जागांमध्ये आणखी काही जागांची भर घालण्याची भाजप नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आणखी एखादी जागा पदरात पडावी, म्हणून त्यांच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे शिवसेना आक्रमकपणे भाजपच्या काही जागांवर दावेदारी करू लागली आहे. जिल्ह्यातील पाच जागांसाठी त्यांचा दावा असून किमान चार विधानसभा मतदारसंघात तरी शिवसेनेला तिकीट मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली आहे.

शिवसेनेशिवाय राष्टÑीय समाज पक्ष  व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) या दोन पक्षांनीही महायुतीकडे जिल्ह्यातील जागांसाठी दावा केला आहे. दोन्ही पक्षांना किमान एका तरी जागेची अपेक्षा आहे. दोन्ही पक्षाांना दोन जागा दिल्यास भाजपच्या आमदारांची संख्या वाढविण्याच्या इच्छेला दणका बसणार आहे. त्यामुळे या दोन्ही घटकपक्षांबाबत तूर्त विचार केला गेला नाही. दोन्ही पक्षांचे, नेत्यांचे सांगलीशी जवळचे संबंध असल्यामुळे जिल्ह्यातील एखादी जागा मिळावी, म्हणून ते प्रयत्नशील आहेत. शिवसेना, भाजपमध्येच जिल्ह्यातील जागावाटप झाले, तर घटकपक्षांच्या नाराजीचा सामना युतीला करावा लागू शकतो.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकSangliसांगली