शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महावीर कोविड हॉस्पीटलमधून रूग्णांना चांगली सेवा मिळेल : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 16:22 IST

CoronaVirus CovidHospital Sangli : सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा अडचणीच्या काळात जैन समाज व श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट यांनी श्री भगवान महावीर कोविड हॉस्पीटल, सांगली येथे अत्यंत कमी वेळेत उभे केले. या हॉस्पीटलमधून कोविड रूग्णांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमहावीर कोविड हॉस्पीटलमधून रूग्णांना चांगली सेवा मिळेल : जयंत पाटीलभगवान महावीर कोविड हॉस्पीटलचे उद्घाटन

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा अडचणीच्या काळात जैन समाज व श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट यांनी श्री भगवान महावीर कोविड हॉस्पीटल, सांगली येथे अत्यंत कमी वेळेत उभे केले. या हॉस्पीटलमधून कोविड रूग्णांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.नेमिनाथनगर, सांगली येथे श्री भगवान महावीर कोविड हॉस्पीटलचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, भालचंद्र पाटील आदि उपस्थित होते.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ऑक्सिजन निर्मितीची क्षमता मर्यादित असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. नागरिकांनी घरी राहून कोरोनापासून सुरक्षित रहावे. त्यामुळे कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी झाली तर अनेक प्रश्न आटोक्यात राहतील.

श्री भगवान महावीर कोविड हॉस्पीटलची क्षमता 75 बेड्स ची असून प्रारंभी अत्याधुनिक सेवासुविधांनी युक्त अशा 35 बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये 15 बेड्स आयसीयु व्हेंटिलेटर व हायफ्लो नेझल युक्त तसेच 20 ऑक्सिजन युक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी अतिशय चांगली व्यवस्था निर्माण केल्याचे ते यावेळी म्हणाले.या कार्यक्रम प्रसंगी रूग्णसेवेच्या कार्याबद्दल डॉ. दिनेश बभान, डॉ. राहुल पाटील, आक्सिजन विभागातील कार्याबद्दल सुनील कोथळे, इलेक्ट्रीक विभागातील कार्याबद्दल रमेश खोत व फर्निचर विभागातील कार्याबद्दल महादेव धुमाळ, अमोल चौगुले यांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविकात माजी महापौर सुरेश पाटील यांनी श्री भगवान महावीर कोविड हॉस्पीटलमध्ये तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम असून रूग्णांसाठी शुध्द शाकाहारी मोफत भोजन व्यवस्था तसेच अर्चना मुळे यांच्याव्दारे मानसिक समुपदेशन व आरोग्य प्रबोधन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून या हॉस्पीटलसाठी दानशुर व्यक्तींनी 75 लाखांची अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य साधन दान स्वरूपात देवून बहुमोल योगदान दिल्याचे त्यांची सांगितले. सूत्रसंचालन प्रसन्ना शेटे व धन्यकुमार शेट्टी यांनी केले तर आभार राजगोंडा पाटील यांनी मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली