शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

Sangli- दुष्काळाने शेतकरी धास्तावला.. नेत्यांचा मात्र श्रेयवाद रंगला; जत तालुक्यातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 16:22 IST

लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेने शेतकरी निराश

दरीबडची : मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. शासनाच्या कागदी घोड्यांमुळे दुष्काळाचे भयावह चित्र जाहीर झाले नाही. दुष्काळाच्या दाहकतेमुळे शेतकरी धास्तावला आहे. दुष्काळी झळा जाणवत असताना, नेत्यांमध्ये मात्र म्हैसाळचे पाणी तलावात सोडल्याच्या श्रेयवादाची स्पर्धा लागली आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांवर निराशेचे ढग दाटले आहेत.पूर्व भागात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे सरासरी क्षेत्रापैकी केवळ ५१.६ टक्के क्षेत्रावरच पेरा झाला आहे. उगवण झालेले कोंब वाळून गेले. तालुक्यात गाई, बैल, म्हैशी, शेळ्या-मेंढ्या अशा एकूण ३ लाख ४९ हजार ८९५ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे. सध्या तीन हजार २०० रुपये टनने ऊस विकत घेऊन पशुधन जगविले जात आहे. पशुधन जगविण्याची चिंता लागून राहिली आहे.तालुक्यात ८७.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ओढे, विहिरी, तलावांतील पाणी पातळीने तळ गाठला आहे. २७ तलावांपैकी १७ तलाव कोरडे आहेत. सध्या ४१९.०२ द.ल.घ.फू. पाणीसाठा म्हणजे फक्त ३ टक्के पाणीसाठा आहे. पाऊस पडला नाही, तर द्राक्ष बागांची छाटणी घ्यायची कशी? या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे.खासदार, आमदार, विरोधी पक्ष शासन दरबारी दबाव आणण्यात व वस्तुस्थिती मांडण्यात कमी पडले आहेत. याउलट लहान, मोठ्या कामांत फोटोसेशन करून श्रेयवाद लाटण्यासाठी नेत्यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर स्पर्धा सुरू आहे. लोकप्रतिनिधींचे दुष्काळाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.विस्तारित जत पूर्व भागात म्हैसाळ योजना मार्गी लावण्यासाठी, तुबची बबलेश्वर योजनेचे राज्य करार करण्यासाठी व दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.

२५ गावात टँकरने पाणीसध्या २५ गावांना २९ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती आहे. १९७२ पेक्षा भीषण अशी दुष्काळी परिस्थिती आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको, उपोषण केले आहे. परंतु, अद्याप दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झालेले नाही.

‘प्रशासनाने तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवावा. जनता रस्त्यावर येण्याआधी जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, रोजगाराचा प्रश्न मार्गी लावा. वीजबिले माफ करावीत. चारा छावण्या सुरू कराव्यात.’ - प्रवीण आवरादी, जत विधानसभा अध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट)

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटPoliticsराजकारण