शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

वाळवा-शिराळ्यात खासदार दाखवा अन्..! पुन्हा फिरकलेच नाहीत; निवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यांचा विसर पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:14 IST

माने यांच्यारुपाने तरुण आणि नवीन चेहरा मतदारसंघाला मिळाला, यामुळेच तरुण वर्गाने हिरीरीने मतदान करुन निवडून दिले. परंतु माने निवडणुकीच्या प्रचारासाठी आले तेवढेच. त्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा जणू विसरच पडला आहे. त्यामुळे येथे खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा, असेच म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.

ठळक मुद्देधैर्यशील माने आले आणि निवडून गेले

अशोक पाटील ।इस्लामपूर : लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले, माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने प्रचारासाठी वाळवा आणि शिराळा तालुक्यांत आले, मात्र विजय मिळवल्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे ‘खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा’ असे बोलले जात आहे.

वाळवा-शिराळा तालुक्यांत चार अपवाद वगळता खासदारांची नेहमीच आयात करावी लागली आहे. वाळवा-शिराळा क-हाड लोकसभा मतदार संघात असताना आनंदराव चव्हाण, प्रमिलाकाकी चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील यांना निवडून देण्यात आले होते. हे तालुके हातकणंगले मतदार संघात गेल्यानंतर निवेदिता माने, राजू शेट्टी यांनी प्रतिनिधीत्व केले. २0१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण, हा प्रश्न भाजप-शिवसेना युतीपुढे होता. अंतिम टप्प्यात हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले धैर्यशील माने यांना शेट्टी यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली.

माने यांच्यारुपाने तरुण आणि नवीन चेहरा मतदारसंघाला मिळाला, यामुळेच तरुण वर्गाने हिरीरीने मतदान करुन निवडून दिले. परंतु माने निवडणुकीच्या प्रचारासाठी आले तेवढेच. त्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा जणू विसरच पडला आहे. त्यामुळे येथे खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा, असेच म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.

 

राजकीय समीकरणे बदललीलोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात भाजप-शिवसेना होती. माने यांच्या प्रचारासाठी भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, तत्कालीन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाडिक गटाने प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे पालटली आहेत. जे लोकसभेला विरोधात होते, ते आता विधानसभेत हातात हात घालून राज्यकर्ते बनले आहेत. त्यामुळे आता अर्थमंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार मानसिंगराव नाईक एकत्र येऊन भाजपविरोधी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली