शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरात 3 ठिकाणी शिवभोजन योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:40 IST

शिवभोजन योजना महाराष्ट्रात प्रायोगीक तत्वावर सुरू झालेली आहे. सांगली शहरात 3 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 150 संख्येच्या मर्यादेत लोकांना 10 रूपयांमध्ये जेवण देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसांगली शहरात 3 ठिकाणी शिवभोजन योजना सुरूपालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

सांगली : शिवभोजन योजना महाराष्ट्रात प्रायोगीक तत्वावर सुरू झालेली आहे. सांगली शहरात 3 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 150 संख्येच्या मर्यादेत लोकांना 10 रूपयांमध्ये जेवण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कोणीही भुकेल्या पोटी राहू नये, गरीबातल्या गरीबाची अन्नाची भ्रांत मिटावी या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली असून ही योजना राज्यात अत्यंत यशस्वी होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.सांगली एसटी स्टॅण्ड परिसरातील उपहारगृहामध्ये सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेतील केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल आदि उपस्थित होते.राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने सांगली शहरात एसटी स्टॅण्ड परिसर उपहारगृह, मार्केट यार्ड व सांगली सिव्हील हॉस्पीटल परिसरातील शिंत्रे हॉस्पीटलच्या खाली शिवभोजन योजनेतील केंद्र आज सुरू करण्यात आले आहे. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहाणार आहेत. या भोजनालयांमध्ये बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल.ठाकरे साहेबांना पुण्याई लाभू देआज या केंद्रावर जेवण केलेल्या समडोळी येथील कष्टकरी महिला सुशिला लोंढे यांनी १० रूपयांत चांगलं जेवण मिळालं. भाजी, आमटी, चपाती, भात सगळं व्यवस्थित मिळालं. ठाकरे साहेबांना पुण्याई लाभू दे असा शुभार्शिवाद दिला.कसबे डिग्रजच्या ८४ वर्षीय कृष्णा बळवंत आपटे यांनी आपण कामानिमित्त या ठिकाणी आलो असून या ठिकाणी चांगली सोय झाली. जेवण चांगले होते, भरपूर होते, मी यावर समाधानी आहे असे सांगून ज्येष्ठ लोकांची चांगली सोय झाल्याचे मत व्यक्त केले. 

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयSangliसांगली