शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडणार नाही, विश्वजित कदमांनी मांडली ठाम भूमिका

By हणमंत पाटील | Updated: March 18, 2024 17:04 IST

कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्यावर एकमत

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. परंतु, सांगलीची जागा आम्ही अजिबात सोडणार नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, अशी ठाम भूमिका काँग्रेस आमदार व माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज मुंबईत मांडली.सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे जिल्हा कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील व जयश्री पाटील यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांची मुंबई येथे सोमवारी भेट घेतली. या वेळी सांगलीची जागा कॉंग्रेसला घेण्याची आग्रहाची भूमिका मांडली.त्यानंतर डॉ. कदम म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे आपली ताकद नसताना महाविकास आघाडीमधील कोणत्याही मित्रपक्षांनी दावा करू नये. आम्ही सांगलीच्या जागेसाठी ठाम आहोत. ही जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. कारण सांगलीकरांनी यावर निर्णय घेतला आहे. काँग्रेसची या ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये ताकद आहे. संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत. ते वैयक्तिक काही सांगत असले तरी तो त्यांचा प्रश्न आहे. ते आघाडीची भूमिका मांडू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांना भेटून आमची सांगलीच्या जागेची तीव्र भूमिका मांडलेली आहे.जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व काय ?पैलवान चंद्रहार पाटील आमचे मित्र आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हे वास्तव आहे. सांगलीतील ६०० गावात शिवसेनेचे अस्तित्व काय आहे, याचा नेत्यांनी विचार करून किती ताणायचे हे ठरवावे. कॉंग्रेसने ज्याप्रमाणे दुष्काळाच्या प्रश्नावर मोर्चे काढले, तसे इतरांनी काढले का ? याचाही विचार व्हावा, असे विश्वजीत कदम यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी