शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रतिष्ठानच्या आंदोलनास परवानगी नाकारली, मोठा पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 19:12 IST

राज्यातील दंगलीच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने आंदोलनाचा बेत आखण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारत आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याने कार्यकर्त्यांना आंदोलन रद्द करावे लागले.

सांगली : राज्यातील दंगलीच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी सकाळी आंदोलनाचा बेत आखण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारत सकाळपासून आंदोलनस्थळी बंदोबस्त लावल्याने कार्यकर्त्यांना आंदोलन रद्द करावे लागले.राज्यात अमरावती, नांदेड या शहरांमध्ये झालेल्या दंगलींच्या घटनांचा निषेध शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केला होता. याच बैठकीत घटनेविरोधात मंगळवारी सकाळी दहा वाजता मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दंगलीच्या घटनांचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंदोलनाची तयारी कार्यकर्त्यांनी केली असताना सकाळी आठ वाजल्यापासून पोलिसांनी आंदोलनस्थळी मोठा बंदोबस्त लावला. आंदोलन न करण्याची सूचना संभाजीराव भिडे व त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. तरीही आंदोलन होईल, अशी शक्यता वाटत असल्याने पोलिसांनी दिवसभर येथे बंदोबस्त कायम ठेवला. त्यामुळे कार्यकर्ते आंदोलन करण्यास आले नाहीत.राज्यात ठिकठिकाणी झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सांगली जिल्ह्यात दक्षता घेतली आहे. सोशल मीडियावर वॉच ठेवतानाच शहरात ठिकठिकाणी संचलन सुरु करण्यात आले आहे. याच प्रश्नावर शिवप्रतिष्ठानने आंदोलन ठेवल्याने पोलिसांनी परवानगी नाकारत आंदोलन होऊ दिले नाही. मंगळवारीही सांगलीत पोलिसांनी संचलन केले.

टॅग्स :SangliसांगलीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी