शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अमेरिकेतील टेक्सासमध्ये साजरा झाला शिवजयंती उत्सव, पालखी सोहळा ठरला लक्षवेधी

By श्रीनिवास नागे | Updated: March 28, 2023 17:24 IST

अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांनी सादर केलेल्या ‘शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दिली दाद

पुनवत (जि. सांगली) : अमेरिकास्थित मराठी बांधवांनी टेक्सास राज्याची राजधानी ऑस्टिन येथे एकत्र येत दि. २५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. यानिमित्त पारंपरिक भारतीय वेशात मराठी बांधवांनी ढोल, लेझीम या वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून भगवा ध्वज फडकवला.अमेरिकेत मराठी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. भारतीय व मराठमोळे सण व उत्सव तेथे साजरे केले जातात. तेथील ‘माझा महाराष्ट्र’ (ऑस्टिन) या संस्थेने शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले. यासाठी संस्थेने टेक्सास सरकारकडे उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली. सरकारच्या परवानगीनुसार २५ मार्च रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.कॅपिटॉल बिल्डिंगसमोर अमेरिका आणि टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर भगवा ध्वज मोठ्या दिमाखात फडकला. हा समस्त मराठी लोकांसाठी अभिमानाचा, संस्मरणीय आणि भावनिक क्षण होता. शिवरायांच्या जन्मोत्सवासाठी भव्य मंच उभारण्यात आला होता. खास पालखी बनवण्यात आली होती. थ्री डी तंत्रज्ञानाने शिवरायांच्या प्रतिमेची छपाई केली होती. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांनी सादर केलेल्या ‘शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. माय भवानी तुझे लेकरू, वेडात मराठे वीर दौडले सात, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, या गीतांनी सर्व वातावरण शिवमय झाले.मर्दानी खेळ आणि भगवापालखीसमोर भगवा ध्वज दिमाखात फडकाविण्यात आला. मिरवणुकीत पालखीमागे नऊवारीतील महिलांनी लेझीम नृत्य सादर केले. ढोल-ताशा पथकही सहभागी होते. उपस्थितांनी जयघोष करीत शिवरायांना अभिवादन केले.

टॅग्स :SangliसांगलीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAmericaअमेरिका