शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांनी मताधिक्य राखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:27 IST

लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे.

ठळक मुद्देशिराळा विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांनी मताधिक्य राखलेआमदार नाईक गट, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले मताधिक्य

विकास शहाशिराळा : लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे.शिराळा मतदारसंघात शिराळा तालुक्यासह वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सम्राट महाडिक, अभिजित पाटील हे वाळवा तालुक्यातील नेते, तर आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख या नेत्यांत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड सुरू होती.राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या गावाचाही या मतदारसंघात समावेश आहे. या गावात धैर्यशील माने यांना आघाडी मिळाली. त्यांना ४५६ मते मिळाली, तर राजू शेट्टी यांना १९८ मते मिळाली.चिखली हे आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे गाव. येथे माजी आमदार नाईक गटाने बाजी मारली. राजू शेट्टी यांनी ३६८ मतांचे मताधिक्य घेतले आहे, तर कोकरूड या सत्यजित देशमुख यांच्या गावात १२५१ मतांचे मताधिक्य राजू शेट्टी यांना मिळाले आहे.शिराळा शहरात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची ताकद आहे; मात्र यावेळी आमदार नाईक गटाने धैर्यशील माने यांना ५५९ मतांचे मताधिक्य दिले आहे. याला कारणीभूत शिराळा नागपंचमी विषय ठरला आहे.नागपंचमीबाबत येथील नागरिकांचे शिष्टमंडळ राजू शेट्टी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. यावेळी शेट्टी यांनी शिष्टमंडळाला चांगली वागणूक दिली नाही, अशी व्हीडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. याचा फटका बसल्याने येथे माने यांना मताधिक्य मिळाले.बिऊर हे भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांचे गाव आहे. येथे त्यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र येथे राजू शेट्टी यांना ४१७ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. वाळवा तालुक्यातील कासेगाव हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गाव आहे. येथे शेट्टी यांना २२५२ मताधिक्य मिळाले आहे.

पेठ येथे नानासाहेब महाडिक यांचे वर्चस्व आहे. येथे चुरशीने प्रचार केल्याने फक्त १०८ मते शेट्टी यांना जास्त मिळाली. येलूर हे सम्राट महाडिक यांचे गाव आहे. याठिकाणी माने यांना ६१६ मतांचे मताधिक्य मिळाले. चिकुर्डे हे शिवसेनेचे अभिजित पाटील यांचे गाव आहे. येथे शेट्टी यांना १९२ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. कुरळप हे राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे गाव आहे. येथे राजू शेट्टी यांना ८८२ इतके मताधिक्य मिळाले.शिराळा तालुक्याने ११ हजार ५३३, तर वाळवा तालुक्याने ९५०९ असे २१ हजार ४२ मतांचे मताधिक्य राजू शेट्टी यांना मिळाले आहे. तर वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांना १० हजार २२२, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांना ६०७ मते मिळाली आहेत. 

टॅग्स :sangli-pcसांगलीJayant Patilजयंत पाटीलSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगली