विटा : खानापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदेसेनेच्या सुवर्णा प्रशांत भोसले यांची तर उपसभापती पदी सुहास (नाना) मालोजीराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या खानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे सर्व आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. खानापूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षित होते. मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीची विशेष सभा अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव तथा गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्या उपस्थितीत झाली.
वाचा : मिरजेत सभापती निवडीत भाजपला धक्का; काँग्रेसच्या तन्वी कमलेकर विजयीयावेळी सभापती पदासाठी नागेवाडी पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या शिंदेसेनेच्या सुवर्णा प्रशांत भोसले तर उपसभापती पदासाठी बलवडी (खा.) गणातून विजयी झालेले सुहास (नाना) शिंदे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी जाहीर केले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला. नूतन सभापती व उपसभापती यांचा उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य महेश घोरपडे, रोशन जाधव, प्रतिभा शेंडे, पायल कदम, तेजश्री लोखंडे, पांडुरंग खोत, गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Summary : Suvarna Bhosle of Shinde Sena elected unopposed as Khanapur Panchayat Samiti Chairperson. Suhas Shinde became Deputy Chairperson. All eight Shinde Sena candidates won previously. Celebrations followed the election.
Web Summary : शिंदे सेना की सुवर्णा भोसले खानापूर पंचायत समिति की सभापति निर्विरोध निर्वाचित हुईं। सुहास शिंदे उपसभापति बने। इससे पहले शिंदे सेना के सभी आठ उम्मीदवार जीते थे। चुनाव के बाद जश्न मनाया गया।