शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

समझोत्याच्या राजकारणाने शिंदे गट जोरात...

By admin | Updated: June 30, 2016 23:32 IST

आष्टा नगरपालिका रणांगण- संभाव्य चित्र

सुरेंद्र शिराळकर -- आष्टा --राज्यातील सर्वात जुन्या नगरपरिषदेपैकी एक असलेल्या आष्टा नगरपरिषदेचे राजकारण गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ शिंदे घराण्याभोवती केंद्रित राहिले आहे. लोकाभिमुख कारभार करताना माजी आ. विलासराव शिंंदे यांचे वडील काकासाहेब शिंंदे, चुलते बापूसाहेब शिंंदे, बंधु झुंझारराव शिंंदे यांनी थेट नगराध्यक्षपद भूषविले. ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील व विलासराव शिंदे यांच्यातील संघर्षानंतर नवीन राजकीय समिकरणे पुढे आली. मात्र नंतरच्या काळात जयंत पाटील व शिंदे यांनी बेरजेचे राजकारण करून शहराच्या विकासाला गती दिली आहे.विलासराव शिंंदे व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यातील १९७७ विधानसभेच्या निवडणुकीनंतर आष्ट्यामध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला. पुढे हा संघर्ष आमदार जयंतराव पाटील यांच्यासोबतही सुरू राहिला. मात्र ९० च्या दशकात दोन्ही नेत्यांनी संघर्षाच्या राजकारण करण्याला पूर्णविराम दिला. विकासाला प्राधान्य देत बेरजेचे राजकारण सुरू केले. तेव्हापासून नगरपरिषदेतही जयंत पाटील व विलासराव शिंंदे गट एकत्र येऊन पालिकेचे राजकारण करीत आहे. परिणामी पालिकेत विलासराव शिंदे गटाची मांड पक्की झाली आणि दुसरीकडे वाळवा विधानसभा मतदारसंघातील जयंत पाटील यांचा मोठा विरोध मावळला. १९९६ पासून विलासराव शिंंदे यांची पालिकेवर एकहाती सत्ता आहे. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप यांचा संघर्ष अपुरा पडत आहे. आगामी निवडणुकीत जयंत पाटील व शिंंदे गट एकत्रितच लढण्याची शक्यता आहे, तर गतवेळी वेगवेगळे लढलेले विरोधक एकत्रित लढण्याच्या तयारीत आहेत. गतवेळी सर्व विरोधकांना ६० टक्केदरम्यान मते मिळाली होती. मात्र त्यांनी स्वतंत्र्य लढण्याचा निर्णय घेऊन सत्ताधारी गटाला मदतच केली होती. नगरपालिकेत आजवर दोन थेट नगराध्यक्ष झाले आहेत. ते दोन्ही शिंंदे घराण्यातील आहेत. विलासराव शिंंदे यांचे वडील काकासाहेब शिंंदे, तर बंधू झुंझारराव शिंंदे यांनी थेट नगराध्यक्षपद भूषविले आहे. मागील पाच वर्षात ओबीसी महिला व खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे पाच वर्षात झिनत आत्तार, रंजना शेळके व मंगलादेवी शिंंदे यांना नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. पालिकेसाठी पुढील आरक्षण खुल्या वर्गातील पडण्याची शक्यता आहे. यावेळी शिंंदे घराण्यातील उमेदवार असण्याची शक्यता आहे. यामध्ये विलासराव शिंदे यांचे चिरंजीव विशाल शिंंदे, राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्याप्रमाणे झुंझारराव पाटील, शैलेश सावंत, प्रकाश रूकडे, नितीन झंवर यांचीही नावे चर्चेत आहेत.थेट निवडीमुळे दिग्गजांची कोंडीथेट नगराध्यक्ष निवडीच्या शासनाच्या निर्णयामुळे आता दिग्गज नगरसेवकांना उपनगराध्यक्ष व सभापती पदावर समाधान मानावे लागणार आहे. कारण एकदा निवड झाल्यानंतर अडीच वर्षे पदावरील व्यक्ती बदलता येणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र इतर महत्त्वाची पदे पदरात पाडून घेण्यासाठी शिंंदे व जयंत पाटील गटाकडूनच उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांनी आतापासूनच शड्डूठोकला आहे. येत्या २ तारखेला होणाऱ्या प्रभाग आरक्षण सोडतीकडे सर्व इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. सब कुछ राष्ट्रवादी... नगरपरिषदेवर सध्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. यामध्ये माजी आमदार विलासराव शिंदेप्रणित शहर विकास आघाडीचे १३, तर जयंत पाटील गटाच्या नागरिक संघटनेचे ६ सदस्य आहेत. गतवेळच्या निवडणुकीत विरोधी काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा जोर लावला. पण त्यांच्यामध्ये ऐक्य नसल्याने राष्ट्रवादीने सहज बाजी मारली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसे, स्वाभिमाानी शेतकरी संघटना, शिवसेना, काँग्रेसने एकत्र येत गतवेळची चूक सुधारत लोकशाही आघाडीची स्थापना केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे दिला आहे. असे असले तरी जयंत पाटील अथवा विलासराव शिंदे यांच्यासारखा ताकदीचा नेता पाठीशी नाही.आष्टा नगरपरिषद ही एक राज्यातील आदर्श नगरपालिका म्हणून नावा-रूपाला आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवित पालिकेने राज्यात दबदबा निर्माण केला आहे. ज्येष्ठ नेते विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराने चौफेर विकास साधला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले असले तरी विलासराव शिंदे गट व आमदार जयंत पाटील गटाच्या समझोत्याच्या राजकारणाने इतर विरोधकांचा आवाजच उरलेला नाही. प्रश्न आहे तो शिंदे गट व जयंत पाटील गटातील जागा वाटपातील चढाओढीचा...