शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवणी... शून्य लोकसंख्येचे गाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 00:58 IST

प्लेगच्या साथीमुळे गाव स्थलांतरित : शिराळ्यात विलीनीकरणाची मागणी

विकास शहा -- शिराळाशून्य लोकसंख्या असलेले, मात्र महसुली उत्पन्न देणारे म्हणून शिराळा तालुक्यातील शिवणीची ओळख बनली आहे. ९० वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली आणि येथील ग्रामस्थ शेजारच्या शिराळा गावात वास्तव्यास गेले. या गावच्या हद्दीत खातेदारांची घरे, जनावरांची शेड आहेत, पण गावठाण अस्तित्वात नसल्याने व अपेक्षित उत्पन्न नसल्याने ग्रामपंचायत नाही. हे गाव शिराळ्यात विलीन करावे, अशी मागणी प्रलंबित आहे.शिवणी हे गाव शिराळ्यालगत अर्ध्या किलोमीटरवर आहे. १९१८ पूर्वी ते ५०० ते ५५० लोकसंख्येचे गाव होते. २९३.८७ हेक्टर क्षेत्रफळ असून, २७०.९८ हेक्टर क्षेत्र जमीन पिकाऊ आहे. त्यापैकी २५०.५९ हेक्टर बागायती आहे. ६.४२ हेक्टर अंतर्गत रस्त्यांसाठी अशी नोंद आहे. तेथे ३६२ खातेदार असून त्यांच्याकडून शासनाला दरवर्षी ६ हजार १२५ रुपये महसूल मिळतो. शिवणी गावठाणाचे क्षेत्र नऊ एकर दोन गुंठे एवढे अल्प आहे.१९१८-१९ च्या दरम्यान प्लेग, पटकी, नारू या साथीच्या रोगांमुळे येथे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. शिराळ्यात जागा उपलब्ध असल्याने येथील सर्व कुटुंबे शिराळ्यात स्थलांतरित झाली. त्यांना आजही ‘शिवणीकर’ असे संबोधले जाते.छत्रपती शिवाजी महाराजांना शिवणी येथे भुईकोट किल्ला बांधायचा होता. त्यासाठी त्यावेळी पांढरी मातीही आणण्यात आली होती. मात्र हा किल्ला येथे न होता शिराळ्याजवळ असणाऱ्या तोरणा ओढ्यानजीक दक्षिण बाजूस बांधण्यात आला. आजही या किल्ल्याचे अस्तित्व येथे पाहायला मिळते.वतनदारांचे गाव म्हणून शिवणीची खास ओळख आहे. गावकामगार पोलीस पाटीलकी सुर्वे-पाटील यांच्याकडे होती. गावाची चावडी भैरवनाथ मंदिराच्या व्हरांड्यात होती. तिचे अस्तित्व आजही आहे. येथील खैरात पीर देवस्थानचे व्यवस्थापन मुजावर कुटुंबीयांकडे होते. शिवणीच्या परिसरात ‘फाट्यांचे फडे’ ही वनस्पती मोठ्या प्रमाणात होती. फड्यांचे डवंग असे येथील एका विभागास संबोधले जाते. ब्रिटिशांच्या काळात ही वनस्पती नष्ट करण्यात आली.येथील भैरवनाथ मंदिरासमोर पूर्वेकडील बाजूस गुरू-शिष्य परंपरा असलेला नाथपंथीयांच मोठा मठ होता. तेथे मोठ्या प्रमाणात साधू रहात असत. ‘राधामनगिरी’ हे या मठाचे शेवटचे गुरू. शिवणी गावचा गोळा होणारा महसूल या मठास दिला जात असे. या मठाच्या परिसरात भले मोठे वडाचे झाड होते. आज त्याच्या पारंब्यापासून निर्माण झालेल्या दोन वडाच्या झाडांचे अस्तित्व जाणवत आहे. शिवणेश्वर, मारुती, भैरोबा, खैरतपूर दर्गा ही मंदिरे आजही अस्तित्वात आहेत.शिवपरंपरा : अनेक इनाम वर्ग ३ ची देवस्थानेशिवणी गावात शिवपरंपरा असणाऱ्या नाथपंथीयाचा मठ होता. या मठात गुरू-शिष्य परंपरा होती. या मठाच्या मठाधिपती पदासाठी हरिगीरी व रामगिरी या दोघांमध्ये वाद झाला. यावादामध्ये गुरू-शिष्य परंपरा संपली व सर्व साधुसंत संसारी झाले. या गावाचा महसूल या मठात दिला जायचा, मात्र या वादामुळे शिंदे सरकार यांना महसूल गोळा करण्याचा मक्ता दिला गेला. मठाधिपती वाद उच्च न्यायालयापर्यत पोहोचला होता. येथील शिवणेश्वर, मारूती, भैरोबा, खैरातपूर दर्गा यांना सरकार इनामवर्र्ग ३ ची सनद आहे. या गावात कदम, सुर्वे-पाटील, मुगावर गिरीगोसावी हेच वतनदार लोक राहत होते. शिराळा शहरात ११ मारूती मंदिरे आहेत. यापैकी शिवणीत आहे. संभाजीराजांच्या सुटकेचे प्रयत्न शिवणीतूनछत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली, त्यावेळी येथील असणारे मोठे डवंगामध्ये छत्रपतींना सोडविण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी येथे आश्रय देण्यात आला होता आणि येथूनच बंडाचे नियोजन झाले, मात्र हे बंड फसले.