कोकरुड : शिराळा पश्चिम भागातील अनेक गावांत दररोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे शेडगेवाडी बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली.
शिराळा तालुक्यासह पश्चिम भागात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शेडगेवाडी बाजारपेठेत नागरिकांची नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी बुधवार दि. ३० जून ते ६ जुलैपर्यंत ही बाजारपेठ बंद राहणार आहे. मात्र, औषध दुकाने व रुग्णालये सुरू राहतील.