शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नदीत बुडणाऱ्या तिघा मुलांना शर्थीने वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:26 IST

सांगली शहरातील कृष्णा नदीत बुडणाऱ्या तीन शाळकरी मुलांना रॉयल कृष्णा बोट क्लबच्या तरुणांनी धाडसाने वाचविले. सोमवारी दुपारी हा थरारक प्रकार घडला.

ठळक मुद्देकृष्णा नदीत बुडणाऱ्या तिघा मुलांना शर्थीने वाचविले गजानन व प्रतीकच्या धाडसामुळे तिन्ही मुलांचा वाचला जीव

सांगली : सांगली शहरातील कृष्णा नदीत बुडणाऱ्या तीन शाळकरी मुलांना रॉयल कृष्णा बोट क्लबच्या तरुणांनी धाडसाने वाचविले. सोमवारी दुपारी हा थरारक प्रकार घडला.सध्या उन्हाच्या झळा वाढत असल्याने कृष्णा काठावर नागरिक पोहण्यासाठी जातात. सांगलीतील टिंबर एरियामधील आदित्य सातपुते (वय १५), अंकुश सातपुते (१३) व सचिन पाटील (१४) हे तिघे अन्य मित्रांसोबत कृष्णा काठावर पोहण्यास गेले होते. आदित्य सातपुते याला पोहता येत नसल्याने तो नदीकाठावर बसला होता.

काही वेळाने तो पाण्यात उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहून अंकुश सातपुते व सचिन पाटील यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. मात्र भीतीमुळे आदित्यने त्या दोघांनाही मिठी मारली. यामुळे तिघेही बुडू लागले.हा प्रकार रॉयल कृष्णा बोट क्लबचे गजानन नरळे व प्रतीक जामदार यांनी पाहिला. त्यांनी क्षणार्धात पाण्यात उतरुन तिघा मुलांना पाण्याबाहेर काढले. गजानन व प्रतीकच्या धाडसामुळे या तिन्ही मुलांचा जीव वाचला.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली