शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रामध्ये घोळ हा शरद पवारांचा जावईशोध : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:45 IST

देशभरात महाआघाडीचे उमेदवार जेथे विजयी झाले, तेथील मतदान यंत्रे चांगली आणि जेथे पराभूत झाले तेथे गोलमाल, हा आरोप चुकीचा आहे. विरोधक आपले अपयश लपविण्यासाठी असा आरोप करत आहेत. जेथे पराभव झाला, त्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये गोलमाल केला जात असल्याचा जावईशोध बारामतीकरांनीच लावला आहे, अशी मिश्किल टिप्पणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगलीत केली.

ठळक मुद्देमतदान यंत्रामध्ये घोळ हा शरद पवारांचा जावईशोध सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साधला पत्रकारांशी संवाद

सांगली : देशभरात महाआघाडीचे उमेदवार जेथे विजयी झाले, तेथील मतदान यंत्रे चांगली आणि जेथे पराभूत झाले तेथे गोलमाल, हा आरोप चुकीचा आहे. विरोधक आपले अपयश लपविण्यासाठी असा आरोप करत आहेत. जेथे पराभव झाला, त्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये गोलमाल केला जात असल्याचा जावईशोध बारामतीकरांनीच लावला आहे, अशी मिश्किल टिप्पणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगलीत केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देशमुख यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या ईव्हीएमबाबतच्या आरोपावर टीका केली.देशमुख म्हणाले की, देशातील मतदार भाजपच्या पाठीशी आहेत, हे निवडणुकीच्या निकालावरून सिध्द झाले आहे. लोकांचा सरकारवर विश्वास असल्यानेच पुन्हा भाजपला सत्ता मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विरोधकांनी यापूर्वी केलेला कारभार देशातील सर्वसामान्य मतदारांना माहीत आहे. त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे, असे असताना आता विरोधकांकडून मतदान यंत्राचा विषय समोर आणला जात आहे.

मतदान यंत्राबाबत आक्षेप घेऊन संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. यापेक्षा विरोधकांनी आपला झालेला पराभव मान्य करावा. भाजपने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात देशभर केलेल्या विकासकामांची पोहोच म्हणून हा विक्रमी विजय मिळाला आहे.ज्या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले, तेथील यंत्रे चांगली आहेत. ज्या मतदारसंघात पराभव झाला, तेथील यंत्रांमध्ये सेटिंग असल्याच्या तर्क लढवण्यात येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला, तर जनतेचा लोकशाहीवरील विश्वास संपेल, असे भाकित पवारांनी केले होते. परंतु बारामतीमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे. त्यामुळे सर्व यंत्रे चांगली आहेत, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावरून लोकशाही अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून प्रशासनास सर्व त्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडूनही दुष्काळ निवारणाच्या कामांचे नेटके नियोजन करण्यात येत आहे. गरज असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचे, तसेच पिण्याचे पाणी तातडीने पुरविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSangliसांगली