शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांची उंची अन् शरद पवारांचा अनुभवाचा डोस; सांगलीच्या कार्यक्रमातील उपदेश पक्षातील पडझड रोखणार ?

By अविनाश कोळी | Updated: January 18, 2024 17:10 IST

अविनाश कोळी सांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरुज हलत असल्याचे जाणवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्यात वाक्यात नेते व ...

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरुज हलत असल्याचे जाणवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्यात वाक्यात नेते व कार्यकर्त्यांना अनुभवाचे डोस दिले. सत्तेच्या पटाकडे खेचल्या जाणाऱ्यांना लोकनेते राजारामबापूंच्या कार्याची आठवण करून देत विरोधात राहूनही कामे करता येतात, याचा इतिहास मांडला. जयंत पाटील यांची उंची किती मोठी आहे, हे सांगत त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहनही केले. पवारांचा हा डोस जिल्ह्यात कामी येणार की, तो निकामी होणार हे पुढील काळात स्पष्ट होईल.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेल्या सांगली जिल्ह्यात पक्षाची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी महापौर, नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जयंतरावांच्या गडाला हादरे बसू लागले आहेत. संभाव्य पडझड रोखण्यासाठी शरद पवारांनी सांगलीतील कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना अनुभवाचे बाेल सांगितले. राज्याच्या राजकारणात जयंतरावांची उंची मोठी आहे, असे सांगून राजारामबापूंप्रमाणे त्यांच्याही पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांना करावे लागले.सत्तेच्या पटावर राहूनच कामे करता येतात, हा अनेकांच्या मनातील ग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राजारामबापू बहुतांश काळ विरोधात राहिले. तरीही त्यांनी त्या काळात विकासकामे कशी केली, मतदारसंघाचा कायापालट कशापद्धतीने केला, याचा इतिहास मांडला. कामे होत नसल्याचे कारण सांगूनच अनेकांनी पक्षत्याग केला, पण ही पावले कशी चुकीची आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचा हा अल्पसा प्रयत्न पक्षाची पडझड रोखण्यास उपयोगी ठरणार का हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.

पुतण्याशी चर्चा अन् काकांचे स्वागतअजित पवारांची भेट घेऊन आलेले सांगली, मिरज व कुपवाडमधील अनेक माजी नगरसेवक शरद पवारांच्या स्वागतासाठी सांगलीत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनातही होते. त्यामुळेच शरद पवारांनी त्यांना हे अनुभवाचे बोल सांगितले असावेत, अशीही चर्चा रंगली आहे.

जयंतरावांकडून निष्ठेचा मंत्रराजारामबापूंशी निष्ठा असणाऱ्या लोकांचा नावानिशी उल्लेख करून जयंतरावांनी निष्ठेला सलाम केला. बापूंवर प्रेम करणारे लोक कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी गड मजबूत असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील