शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकर उद्योजकाने विकसित केले 'त्रिमितीय विव्हिंग' तंत्रज्ञान, हवाई प्रवासांतर्गत 'या' तंत्राचा होतो वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 13:50 IST

देशभरातील असे हे पहिलेच पेटंट आहे. हवाई प्रवासांतर्गत विमाने, उपग्रह, रॉकेट, हेलिकॉप्टर आदींमध्ये या तंत्राचा वापर होतो

सांगली : प्रगत युरोपियन देशांकडून भारतीय उद्योजकांना नवनवे तंत्रज्ञान देण्यास नकारघंटा मिळणे हा सातत्याचा अनुभव आहे. अशा नकारांना तोंड देतच भारतीय उद्योजकांनी अनेकविध तांत्रिक आविष्कार घडविले आहेत. मिरज औद्योगिक वसाहतीतील शरद काळे या उद्योजकाने त्रिमितीय विव्हिंगचे पेटंट मिळविले आहे. देशभरातील असे हे पहिलेच पेटंट आहे.हवाई प्रवासांतर्गत विमाने, उपग्रह, रॉकेट, हेलिकॉप्टर आदींमध्ये या तंत्राचा वापर होतो. संरक्षण मंत्रालय, मुंबई आयआयटीचा एरोनॉटीक्स विभाग, अहमदाबाद आयआयटी, बंगळुरूची नॅशनल एरोनॉटीक्स लॅबोरेटरी विभाग यांच्यासाठी काळे यांनी हे नवसंशोधित तंत्रज्ञान यापूर्वीच पाठवायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पावर २०१३ पासून त्यांचे काम सुरू होते. गुरुवारी (दि. ३०) पेटंट कार्यालयाने त्यावर मान्यतेची मुद्रा उमटविली. या तंत्राचे स्वामित्व २० वर्षांसाठी काळे यांच्याकडे राहील.असे आहे तंत्रज्ञान...प्रचंड हवाई दाबाला तोंड देणाऱ्या वाहनांना (विमाने, हेलिकॉप्टर, रॉकेट, उपग्रह, मोटारगाड्या आदी) फायबर बॉडी बसविली जाते. कार्बन फॅब्रिक्स असे त्याचे स्वरूप असते. वरून प्लास्टिकसारखे असले, तरी प्रत्यक्षात मात्र फायबर असते. लोखंडापेक्षा सहापटीने मजबूत व हलके असल्याने हवाई क्षेत्रात प्रामुख्याने वापर होतो. या फायबरचे तब्बल ४० थर एकावर एक बसवून विमानाची बॉडी तयार केली जाते. युरोपीय देशांकडून त्याचे तंत्रज्ञान भारताला मिळत नव्हते. आयआयटी शिक्षणानंतर विविध कंपन्यांत काम केलेल्या काळे यांनी मिरजेतील स्वत:च्या कारखान्यात त्रिमितीय फायबरचे तंत्रज्ञान विकसित केले. पेटंटसाठी २०१३ मध्ये अर्ज दाखल केला. त्याला मान्यता मिळाली. आता देशभरात त्याचा वापर सुरू झाला आहे. भारतातील हे पहिले आणि एकमेव तंत्रज्ञान ठरले आहे.

जुन्या पद्धतीच्या फायबरला मागे टाकणारे हे तंत्र आहे. हवाई वाहतूक क्षेत्रासाठी हा बदल क्रांतिकारी ठरेल. सध्या संशोधन व विकास विभागाला पुरवठा सुरू आहे. परदेशी मदत न घेता देशातच ते विकसित करता आले, याचा अभिमान आहे. - शरद काळे, उद्योजक

टॅग्स :Sangliसांगली