शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शामरावनगर, धामणीतील नैसर्गिक नालेच गायब, ड्रोनच्या सर्व्हेत धक्कादायक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:32 IST

सांगली : कृष्णा नदीला येणाऱ्या महापुरांच्या कारणाचा शोध घेण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीतर्फे शनिवारपासून ड्रोनद्वारे पूर पट्यातील भागाचा ...

सांगली : कृष्णा नदीला येणाऱ्या महापुरांच्या कारणाचा शोध घेण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीतर्फे शनिवारपासून ड्रोनद्वारे पूर पट्यातील भागाचा सर्वे सुरू झाला आहे. हरिपूर रोडवरील नैसर्गिक नाल्यापासून शामरावनगर, धामणी, अंकली या पूरबाधित भागातील नैसर्गिक नालेच गायब झाल्याचे धक्कादायक चित्र ड्रोनच्या सर्व्हेत उघडकीस आले. या गंभीर प्रश्नाकडे महापलिका, महसूलच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीचे हणमंतराव पवार, सेवानिवृत्त अभियंता विजय दिवाण, संजय कोरे, प्रदीप वायचळ, आनंदा चोपडे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर रोडवर असणाऱ्या नैसर्गिक नाल्याजवळून ड्रोनद्वारे सर्व्हेस प्रारंभ केला. शरद शिंदे यांनी ड्रोनद्वारे हा सर्व्हे केला असून छायाचित्रे, व्हिडिओ कृती समितीकडे सादर केली आहेत. त्यानंतर कृती समितीचे सदस्य, स्पंदनचे सदस्य व टेक्निकल अभ्यासक यावर अभ्यास करून अहवाल तयार करणार आहेत.कृष्णा नदीचे पाणी हरिपूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमीपासून शहरात शिरते. लिंगायत स्मशानभूमी, हरिपूर रोड, भारतनगर, कोल्हापूर रोडवरून शामरावनगर, अंकली, धामणीकडे कोणत्या मार्गाने हे पाणी सरकते. या परिसरातील मुख्य नैसर्गिक नाल्यासह उप नाल्यांवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे महापुराचे शामरावनगर, धामणी परिसरात शिरल्यानंतर परत जातच नाही. या नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणाबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

विश्रामबागला धोका

अंकलीजवळून जाणारा नागपूर ते रत्नागिरी महामार्गाला मिरज ते अंकलीपर्यंत मोठ्या प्रमाणात भराव घातला आहे. त्यामुळे शामरावनगर मार्गे धामणीहून पलीकडे जाणारे पुराचे पाण्याला मोठा अथडळा तयार झाला आहे. साहजिकच हे पाणी शामरावनगर, धामणीसह विश्रामबागमध्येही पसरू शकते. त्यामुळे विश्रामबागही महापुराच्या कचाट्यात सापडू शकते. याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे, असे मत कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले आहे.

टॅग्स :Sangliसांगली