शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिराळकरांनी सोडवले नागाला कुत्र्यांच्या तावडीतून, घरातील सदस्यांप्रमाणे केले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 14:57 IST

 शिराळकर आणि नाग यांचे प्रेमच काही और आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाला वाचवण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. मंगळवारीही शिराळकरांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून नागाला वाचवून घरातीलच सदस्याप्रमाणेच नागाची त्याची काळजी घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. बी. गावडे , एम.एस. चव्हाण, सुशांत शेनेकर यांनी या जखमी नागावर उपचार केले.

ठळक मुद्देशिराळकरांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून नागाला वाचविले चार ते पाच कुत्र्यांनी चढवला हल्ला, नाग जखमीशिराळकरांनी वाचविले नागाचे अनेकदा प्राण

 विकास शहाशिराळा, दि. ५ : शिराळकर आणि नाग यांचे प्रेमच काही और आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाला वाचवण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. मंगळवारीही शिराळकरांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून नागाला वाचवून घरातीलच सदस्याप्रमाणेच नागाची त्याची काळजी घेतली.मंगळवारी सकाळी एका नागावर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला चढवला, त्यात नाग जखमी झाला. शिराळ्यातील युवकांनी हा प्रकार केवळ पाहिला आणि बघ्याची भूमिका न घेता अथवा या प्रकाराचे शुटिंग करत न बसता या कुत्र्यांना हाकलले आणि या जखमी नागावर त्वरित शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.आज सकाळी ९ च्या दरम्यान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळील शेतात एका नागावर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला चढवला, यातील काही कुत्री नागाचा चावा घेत होती, तर काही कुत्री पंजाने नागावर हल्ला करत होते.

ही घटना शेताकडे जाणाऱ्या अभिजित यादव, विक्रांत पवार, शिवकुमार आवटे, आकाश सपाटे, आदिनाथ निकम, रोहन म्हेत्रे, नितीन कुरणे या युवकांनी पहिली. त्यांनी या कुत्र्यांना तेथून हाकलण्याचा प्रयत्न केला, पण या कुत्र्यांनी या युवकांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र जीव धोक्यात घालून या युवकांनी शेवटी नागाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. कुत्र्यांच्या हल्ल्यात नागाच्या शेपटी, फण्याजवळ, तसेच अंगावर सहा ते सात ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या होत्या. या युवकांनी या नागास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले तसेच वनक्षेत्रपाल तानाजी मुळीक याना कळवले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. बी. गावडे , एम.एस. चव्हाण, सुशांत शेनेकर यांनी या जखमी नागावर उपचार केले.यावेळी वन कर्मचारी सचिन पाटील, बाबा गायकवाड यांनी उपचारानंतर नागाला ताब्यात घेतले. या नागावर अजून चार-पाच दिवस उपचार करावे लागणार आहेत. त्यामुळे या नागास खास पेटीत ठेवण्यात आले आहे. ही बातमी समजताच नागरिकांनी जखमी नागाला पाहण्यासाठी या दवाखान्यात मोठी गर्दी केली.शिराळकरांनी वाचविले नागाचे अनेकदा प्राणयापूर्वीही शिराळा येथील नागरिकांनी कूपनलिकेमध्ये अडकलेल्या नागाला सोडविले आहे, तसेच कित्येक वेळा शेतातील कामे करताना नांगरात अडकून जखमी झालेल्या नागांचे प्राणही वाचवले आहेत. येथील नागरिकांना अनेकदा सर्पदंश झाला आहे, पण कोणीही, कधीही नागाला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही.

 

या नागाच्या अंगावर सहा सात ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या आहेत, त्यामुळे या जखमा पूर्ण बऱ्या होणे गरजेच्या आहेत अन्यथा या जखमांना मुंग्या लागू शकतात. यामुळे या नागाचा मृत्यू होऊ शकतो. या जखमा पूर्ण बऱ्या झाल्यानंतर नागाला सोडून द्यावे लागेल      - डॉ. व्ही .बी. गावडे पशुवैद्यकीय अधिकारी, शिराळा

युवकांनी कुत्र्यांच्या हल्ल्यातून नागांचे प्राण वाचवून एक चांगले काम केले आहे. त्यांनी एक वन्य जीव वाचवला आहे. जखमा पूर्ण बऱ्या होईपर्यंत या नागास पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले जातील. त्यानंतर पूर्ण बरा झाल्यावर नागास सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल .       तानाजीराव मुळीक,वनक्षेत्रपाल, शिराळा

 

टॅग्स :Sangliसांगलीforestजंगलhospitalहॉस्पिटल