शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग विरोधकांनी सांगलीत पालकमंत्र्यांची गाडी अडवली, सरकारविरोधात जोरदार घोषणा 

By अशोक डोंबाळे | Updated: June 22, 2024 17:36 IST

सुरेश खाडे यांनी शासनाकडून शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचे आश्वासन

सांगली : शेतकऱ्यांना भूमिहीन करून महापुराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावेळी शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी अडवण्यात आली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृतीच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी झालेल्या आंदोलनात खासदार विशाल पाटील, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, डॉ. जितेश कदम, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, महेश साळुंखे, संजय हजारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

महामार्ग स्थगित करण्याऐवजी सरकारने रद्द करावा, अशी आग्रही मागणी केली. पालकमंत्री खाडे नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना अडवण्यात आले. मंत्री खाडे यांनी मोटारीतून उतरून निवेदन स्वीकारले. दरम्यान, घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली.महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावांतून जात आहे. शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मनेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलवाडी इत्यादी गावांतील पाच हजार शेतकरी बाधित होत आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, त्यांना जमिनीचा मोबदला अत्यंत कमी मिळणार आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांसह सर्वच आंदोलकांनी पालकमंत्री खाडे यांच्याकडे भूमिका मांडली.

देवही माफ करणार नाही : धैर्यशील मानेपरमेश्वराच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणी नांगर फिरवत असेल, तर त्यांना देवदेखील माफ करणार नाही, अशी टीका करून खासदार धैर्यशील माने यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसने काढलेल्या मोर्चात सहभागी होत माने यांनी सरकारविरोधात जोरदार टीका केली. जेव्हा शेतकऱ्यांचा विषय येईल, तेव्हा सरकार विरोधात उभे राहू. शक्तिपीठ महामार्गविरोधात लोकसभेत विशाल पाटील यांच्यासोबत आवाज उठविणार, असे आश्वासनही माने यांनी शेतकऱ्यांना दिले.

महामार्ग शेतकऱ्यांवर लादू देणार नाही : विश्वजित कदमशासनाने गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करण्याची भूमिका घेतली आहे. हा महामार्ग जाणाऱ्या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कोणतीच कल्पना न देता हुकूमशाही पद्धतीने हा निर्णय लादला गेला असून, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. पर्यायी रस्ते उपलब्ध असताना ८५ हजार कोटी रुपये खर्च करून कंत्राटदारांचे खिसे भरणारा हा महामार्ग शेतकऱ्यांवर आम्ही लादू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीguardian ministerपालक मंत्रीhighwayमहामार्ग