शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील शंभरावर गावात सौरउर्जेने फुलणार शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 16:49 IST

विजेच्या मागणीत वाढ होत असताना, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा, भारनियमनाचा झटका सहन करावा लागत आहे. यास समर्थ पर्याय म्हणून जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून २५ प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, त्याव्दारे ४० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्यांना दिवसा विजेची उपलब्धता होणार आहे.

ठळक मुद्दे४0 मेगॉवॅट वीजेची निर्मिती शक्यशेतकऱ्यांना दिवसाही मिळणार वीज

शरद जाधव

सांगली : विजेच्या मागणीत वाढ होत असताना, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा, भारनियमनाचा झटका सहन करावा लागत आहे. यास समर्थ पर्याय म्हणून जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून २५ प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, त्याव्दारे ४० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्यांना दिवसा विजेची उपलब्धता होणार आहे.विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील अडचणींमुळे भारनियमनाचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर उद्योगांनाही कमी विजेमुळे त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासन स्तरावरून अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सौरऊर्जेचा पर्याय समोर आला आहे.राज्यात ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषीसाठी ३० टक्के विजेचा वापर होतो. शेतकऱ्यांना वीज देण्याबरोबरच माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे अनुदानही दिले जाते. शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता करून देण्यासाठी गेल्या वर्षापासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. याच योजनेनुसार जिल्ह्यात २५ ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या ३६ मेगावॅट वीज निर्माण होईल इतकी जागा उपलब्ध झाली असून, अजून ४ मेगावॅटसाठीचे नियोजन होणार आहे.जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी प्राधान्य दिले असून, विविध ठिकाणी प्रकल्पाच्या उभारणीसाठी जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील २४६ हेक्टरवर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीपीपी म्हणजेच जनतेच्या सहभागातून प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी विकासकाच्या नेमणुकीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्यांनाही शासनाकडून सोयी-सवलती मिळणार आहेत.सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत : मिळणार अखंडीत वीजसध्या शेतीसाठी वीज देताना ती रात्री दिली जाते, तर दिवसभर कमी दाबाने वीजपुरवठा असतो. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतीबरोबरच पाणी योजनांसाठीही सौर ऊर्जेचा वापर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

सध्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होत असल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याने यातून त्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज दिल्यानंतर शिल्लक वीज उद्योगांना पुरविण्यात येणार असल्याने त्यांचीही विजेची मागणी काहीअंशी पूर्ण होणार आहे. 

सौर ऊर्जा निर्मितीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. पूर्वभागात तर यासाठीचे सर्वोत्कृष्ट स्थान असल्याने प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी २१० एकरहून अधिक जागा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांची विजेची मागणी लक्षात घेऊन प्रकल्पाची उभारणी करणार असल्याने त्यांना फायदा होणार आहे.-विजयकुमार काळम-पाटील, जिल्हाधिकारी

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली