शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नेमिनाथनगरला अत्याधुनिक नाट्यगृह उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:03 IST

सांगली : महापालिकेला नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर शंभर कोटी रूपयांतून सांगलीतील नेमिनाथनगर येथे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी १५ ...

ठळक मुद्दे१५ कोटींची तरतूद : सुधीर गाडगीळ, संगीता खोत यांच्याकडून जागेची पाहणीशंभर कोटीतून भाजी मंडई, रस्ते, ड्रेनेजच्या कामांवर भर

सांगली : महापालिकेला नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर शंभर कोटी रूपयांतून सांगलीतील नेमिनाथनगर येथे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय महापालिका हद्दीतील प्रमुख रस्ते, भाजी मंडई, विस्तारित भागात ड्रेनेज योजना आदी कामांसाठी या निधीतून तरतूद करण्यात आली असून, लवकरच या सर्व कामांचा आराखडा शासनाकडे सादर केला जाणार आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांचा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवारी नेमिनाथनगर येथील महापालिकेच्या खुल्या भूखंडाची पाहणी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांच्यासह नाट्यकर्मींनी केली. या खुल्या भूखंडावर अत्याधुनिक नाट्यगृह उभारले जाणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

नेमिनाथनगर येथील अत्याधुनिक नाट्यगृहासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ७०० आसन क्षमता असणारे हे नाट्यगृह जागतिक दर्जाचे असेल. शासनाच्या शंभर कोटींच्या निधीतून अत्याधुनिक नाट्यगृहाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. याशिवाय सांगलीतील जुन्या गोकुळ नाट्यगृहाच्या जागेवर भाजी मंडई उभारण्यात येणार असून यासाठी ६ कोटींची तरतूद आहे.

सांगली, मिरज भुयारी गटार योजनेतील विस्तारित भाग, तसेच उपनगरांतील काही भागात ड्रेनेज व्यवस्था नाही. अशा ठिकाणी नवीन ड्रेनेज वाहिन्या टाकण्यासाठी १६ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय शास्त्री चौक ते अंकली पोलीस चौकी, कर्नाळ पोलीस चौकी ते हरभट रोड, राम मंदिर ते स्टेशन रोड, महापालिका, मेन रोड यासह अन्य रस्त्यांच्या कामांचाही या निधीत समावेश आहे. मिरजेतील कामांमध्ये भाजी मंडई व ड्रेनेज योजनेचा समावेश आहे. कुपवाडमध्ये स्मशानभूमी, क्रीडांगण व भाजी मंडईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.सांगलीला ६०, तर मिरजेला ४० कोटीशासनाच्या शंभर कोटी रुपयांतून सांगली शहरात ६० कोटी, तर मिरज व कुपवाडला ४० कोटींची विकास कामे करण्यात येणार आहेत. सांगलीत १३, तर मिरज-कुपवाडमध्ये ७ प्रभाग आहेत. प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या प्रभागातील विकास कामांसाठी ५० लाख रुपये मिळणार आहेत. या निधीतून करण्यात येणारी कामे सुचविण्याची सूचना महापौरांनी सर्व नगरसेवकांना केली आहे. त्यानुसार या कामांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. उर्वरित निधीतून शहरातील प्रमुख समस्या मार्गी लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका