सांगलीत समाजकल्याण विभागाच्या दहा कर्मचाऱ्यांची सेवा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:36 AM2018-09-19T00:36:41+5:302018-09-19T00:36:46+5:30

Service of ten employees of Sangli-based Social Welfare Department | सांगलीत समाजकल्याण विभागाच्या दहा कर्मचाऱ्यांची सेवा खंडित

सांगलीत समाजकल्याण विभागाच्या दहा कर्मचाऱ्यांची सेवा खंडित

googlenewsNext

सांगली : समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेल्या शिपायांच्या नियमबाह्य भरतीमधील दहा कर्मचाºयांना (शिपाई) दि. १७ सप्टेंबरपासून सेवेतून कमी केले आहे. समाजकल्याण आयुक्तांच्या या कारवाईमुळे येथील कार्यालयात खळबळ उडाली आहे. या भरतीस जबाबदार असलेले तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे, प्रभारी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, विद्यमान सहायक आयुक्त सचिन कवले यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयातील आणि जिल्ह्यातील वसतिगृहामधील शिपाई पदाच्या २७ रिक्त जागांसाठी ७ सप्टेंबर २०१४ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करून लगेच लेखी परीक्षा घेतली होती. त्याचदिवशी निवड यादीही प्रसिध्द करण्यात आली. प्रत्यक्षात ही यादी प्रसिध्द करताना निवड समितीचा कोठेही विचार करण्यात आला नाही. निवड समितीला डावलून भरती प्रक्रिया राबविल्याबाबत तक्रारी झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. रिक्त जागांची भरती करताना बिंदू नामावलीबाबत महसूल विभागाच्या सहायक आयुक्तांकडून परवानगी घेण्यात आली नाही. शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविताना पारदर्शक पध्दतीचा अवलंब करणे अभिप्रेत असताना, सामान्य प्रशासनाच्या नियमांचे पालन झाले नाही.
ही सर्व भरती प्रक्रियाच राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी नियमबाह्य ठरविली आहे. या भरतीमधील २७ पैकी तृप्ती रवींद्र आपटे (मुलींची निवासी शाळा, बांबवडे, ता. पलूस), अंकुश जयसिंग पाटील (मुलांचे वसतिगृह तासगाव), शरद सदाशिव कोळेकर (मुलांचे वसतिगृह, कवठेमहांकाळ), भगवंत दादू कोकरे (मुलांचे वसतिगृह, जत), संतोष सोमा साबळे (मुलांचे वसतिगृह, कडेगाव), विजयश्री बबन भालचिन (मुलींचे वसतिगृह, पलूस), दिनेश बाळासाहेब कलकुटगी (मुलांचे वसतिगृह, विटा, ता. खानापूर), गीता विलास खोत (मुलींचे वसतिगृह, आटपाडी), रोहन संजय दळवी (मुलांचे वसतिगृह, पलूस), सचिन भागवत ढोले (मुलांचे शासकीय वसतिगृह, आटपाडी) या दहा कर्मचाºयांना नियुक्ती दिली होती. त्यांची सेवा दि. १७ सप्टेंबरपासून खंडित केली आहे. उर्वरित १७ कर्मचाºयांना तक्रारी आल्यामुळे नियुक्तीच दिली नव्हती. त्यामुळे त्या कर्मचाºयांची निवड यादी रद्द केली आहे.
कर्मचारी न्यायालयात जाणार
सहायक आयुक्त कार्यालयाकडे जागा निघाल्यामुळे आम्ही अर्ज करून शासकीय नियमानुसार असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. भरती प्रक्रियेत अधिकाºयांनी चुका केल्या असतील, तर त्यांची शिक्षा आम्हाला का, असा सवाल काही कर्मचाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे केला आहे. या कारवाईविरोधात कामगार न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजकल्याण आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्तांच्या कारवाईमुळे सांगलीच्या सहायक आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे. चुकीच्या, अनियमित, नियमबाह्य भरतीप्रक्रियेस जबाबदार तीन अधिकाºयांचीही सखोल चौकशी केली जाणार आहे.

Web Title: Service of ten employees of Sangli-based Social Welfare Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.