शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

राज्यातील प्रत्येक तालुक्यात मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय, कामगार मंत्री सुरेश खाडेंनी दिली माहिती

By संतोष भिसे | Published: May 06, 2023 5:34 PM

सांगली : राज्यातील प्रत्येक तालुक्यात मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय प्रस्तावित असल्याची माहिती पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. ...

सांगली : राज्यातील प्रत्येक तालुक्यात मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय प्रस्तावित असल्याची माहिती पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे सांगलीत आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. खाडे म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. मुलींनाही उद्योगक्षेत्रात प्रोत्साहित करण्यासाठी  प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र आयटीआय प्रस्तावित आहे. यावेळी खाडे व गाडगीळ यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी आयोजित केलेल्या तंत्रप्रदर्शनाची पाहणी केली.  मेळाव्यात इस्लामपूर येथील हर्षल पाटील, सांगलीतील प्रा. संदीप पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयक निशा पाटील, कौशल्य विकास समन्वयक ऋषिकेश जाधव, प्रवीण बनकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. बी. देशपांडे यांनी प्रस्ताविक केले. उपप्राचार्य एम. एस. गुरव यांनी आभार मानले.कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम उपस्थित होते. संयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गट निदेशक एस. के. गोसावी, जी. एम. दंडगे, ए. एस. धानोरकर, यु. व्ही. लोहार आदींनी केले.

टॅग्स :Sangliसांगलीiti collegeआयटीआय कॉलेज