सांगली : वांगी (ता. कडेगाव) येथून चाेरीस गेलेली मुऱ्हा जातीची म्हैस इंदापूर (पुणे) येथून जप्त करण्यात आली. विलास श्यामराव सरतापे (रा. माळखांबी, ता. माळशिरस) असे म्हैस चोरलेल्या संशयिताचे असून, त्याच्यासह अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत.
वांगी येथील सर्वोदय शंकर सूर्यवंशी यांच्या शेतात संशयित विलास कामास होता. त्याने व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून सूर्यवंशी यांच्या गोठ्यातून गाभण म्हैस चोरून नेली. त्याने चोरलेली म्हैस इंदापूर (जि. पुणे) येथील नातेवाइकाकडे दिल्याचे स्पष्ट झाले. तेथून ४० हजार रुपये किमतीची म्हैस जप्त करण्यात आली आहे. संशयित सराईत असून, त्याने आणखी काही चोरीचे गुन्हे केले असल्याची शक्यता आहे.