ढालगाव येथील ग्रामपंचायतीस सीमा आठवले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ढालगाव रेल्वे स्थानकावर नागपूर-यशवंतपूरसह सर्व लांब पल्ल्याच्या गाड्याना थांबा, रिझर्व्हेशनची सोय, प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी पादचारी पूल, रेल्वे पोलीस ठाणे, ढालगाव परिसरातील सर्व रस्ते दुहेरी करावेत, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रेल्वे अंडरग्राऊंड पूल मोठा करावा, ढालगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, रेल्वे पुलाखाली पाणी साचते. त्याची व्यवस्था करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी उपसरपंच संतोष देसाई, जनार्दन देसाई, ग्रामपंचायत सदस्य विजय घागरे, अभिजित मायणे, जितेंद्र आठवले, राजू साबळे, माणिक देसाई, आदी उपस्थित होते.
फाेटाे : २९ ढालगाव १
ओळ : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे सीमा आठवले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.