शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी काळ्या फिती लाऊन काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 17:33 IST

Education Sector Teacher Sangli: शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील शिक्षक सोमवारी (दि.५) काळ्या फिती लाऊन काम करणार आहेत. शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देमाध्यमिक शिक्षकांचे सोमवारी काळ्या फिती लाऊन काम शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांकडे लक्ष वेधणार

सांगली : शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील शिक्षक सोमवारी (दि.५) काळ्या फिती लाऊन काम करणार आहेत. शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी ही माहिती दिली.मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शिक्षण क्षेत्राच्या अनेक मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहेत, पण शासन दुर्लक्ष करत आहे. २००५ पूर्वी रुजू झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन व भविष्यनिर्वाह निधी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा, २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी,  आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

कोरोनाग्रस्तांना विशेष रजा व प्राधान्य अनुकंपा योजना लागू करावी, अघोषित शाळा व तुकड्यांना निधीसह अनुदानास पात्र जाहीर करावे, अंशत: अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण द्यावे, २००३ पासूनच्या अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता द्यावी, विशेष शिक्षकांना नियमित व थकीत वेतन द्यावे, त्यांचे समायोजन करावे, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रद्द करु नयेत, संगणक शिक्षकांना सेवेत घ्यावे, भ्रष्टाचारी शिक्षणाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ग्रंथपालांसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी, अशैक्षणिक कामांतून मुक्तता करावी, कॅशलेस विमा योजना लागू करावी, क्रीडा विभागाच्या अनुदान वितरणातील भ्रष्टाचार थांबवावा आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. निवेदनावर नागरगोजे यांच्यासह बजरंग शिंदे, विजय माने, रमेश कोष्टी, बाळासााहेब चोपडे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकSangliसांगली