शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 11:50 IST

चिंचणी येथील जयसिंग बाबुराव पाटील (65) यांचा कराड येथील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

कडेगाव (सांगली) : मागील आठवड्यातच स्वाइन फ्लूने वांगी (ता. कडेगाव) येथील आनंदराव यशवंत बोडरे यांच्या मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कडेगाव तालुक्यात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी गेला आहे. चिंचणी येथील जयसिंग बाबुराव पाटील (65) यांचा शनिवारी (15 सप्टेंबर) सायंकाळी कराड येथील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. कडेगाव तालुक्यात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिंचणी येथे राहणाऱ्या जयसिंग बाबुराव पाटील यांना ताप, खोकला व सर्दी येऊ लागल्याने तसेच धाप लागत असल्याने त्यांना चिंचणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले होते. यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या घशातील द्रव स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी विषाणुविज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यामध्ये त्यांचा एच 1-एन 1 म्हणजेच स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूSangliसांगली