शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांच्या घरांवर जेसीबी चालवला, वन विभागास अनुसूचित जमाती आयोगाने बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:23 IST

‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत ‘राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने’ ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली

कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथे वन खात्याच्या औषधी वनस्पती प्रकल्पासाठी २७ मार्च राेजी वन विभागाच्या जागेमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या गोरगरिबांच्या घरांवर जेसीबी चालविण्यात आला. काेणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढल्याने येथील १५ कुटुंबे बेघर झाली. याबाबतचे वृत्त २८ मार्च राेजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत ‘राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने’ ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी प्रधान मुख्य वनरक्षक वाय. एल. पी. राव, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनाही कळवण्यात आले आहे.कुंडल येथील वन खात्याच्या जागेवर पंधरा कुटुंबे २५ ते ३० वर्षांपासून राहत आहेत. त्यातील बहुतांश कुटुंबे मोलमजुरी करणारी आहेत. वन विभागाच्या औषधी वनस्पती प्रकल्पास या अतिक्रमणांमुळे अडथळा हाेत असल्याने २७ मार्च राेजी वन विभागाच्या पथकाने जेसीबी लावून या कुटुंबांची झाेपडीवजा घरे अवघ्या काही मिनिटांमध्ये जमीनदाेस्त केली. तत्पूर्वी अतिक्रमण काढून घेण्याबाबत संबंधित अतिक्रमणधारकांना वन विभागाच्या वतीने नाेटिसा बजावण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे ही कारवाई रीतसर असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. मात्र नोटीस बजावल्या असल्या तरी सामान्य नागरिकांच्या घरावर जेसीबी फिरवून त्यांना क्षणार्धात बेघर करणे, ही कुठली माणुसकी, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.सुरुवातीला शासकीय यंत्रणा आणि अतिक्रमणधारकांमध्ये बोलणे झाले, मात्र नंतर सरळ जेसीबीने अतिक्रमणे पाडण्यात आली. संबंधित मजूर कुटुंबांनी वर्षानुवर्षे कष्ट करून उभी केलेली खोपटी क्षणात उद्ध्वस्त झाली. कारवाई रीतसर असली तरी किड्या- मुंग्यांप्रमाणे माणसाला असे उघड्यावर टाकून वन खाते कसला प्रकल्प राबवित आहे, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला.या प्रकाराची ‘राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने’ गंभीर दखल घेतली आहे. यामुळे संबंधित कुटुंबांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग