शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सावकारास अटक

By admin | Updated: June 5, 2014 00:11 IST

तुंग येथील प्रकार : वीस हजारांसाठी पान दुकान घेतले

सांगली : वीस हजार रुपये दहा टक्के व्याजाने देऊन त्यापोटी ५० हजार रुपये घेऊन पुन्हा पान दुकान जबरदस्तीने घेणार्‍या तुंग (ता. मिरज) येथील सावकारास आज, बुधवारी गुंडाविरोधी पथकाने अटक केली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शरद अशोक पाटील (वय २६, रा. तुंग, ता. मिरज) असे त्या सावकाराचे नाव आहे. तुंग येथील इरफान सलीम मुल्ला (२५) यांनी आपल्या पत्नीच्या उपचारासाठी शरद पाटील याच्याकडून २० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. यासाठी त्यांनी कोरा मुद्रांकही लिहून दिला होता. ही रक्कम जून २०१२ मध्ये व्याजाने दिली होती. यानंतर मुल्ला यांनी वेळोवेळी हजार, पाचशे असे ५० हजार रुपये शरद पाटील यांना दिले. तरीही तो एकरकमी २० हजार रुपये व व्याजाची रक्कम मागत होता. शेवटी मुल्ला यांनी आपले घर त्यांच्या काकाकडे एक लाख रुपयांना गहाण टाकून शरद पाटील याचे २० हजार रुपये दिले. यानंतरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने व्याजाची रक्कम वीस हजार रुपये होत असल्याचे सांगून या रकमेसाठी तगादा लावला. ही रक्कम देण्यास इरफानने टाळाटाळ केल्यानंतर शरद याने ३ मार्च २०१४ रोजी मुल्ला यांच्या घरात घुसून वीस हजार रुपयांसाठी त्यांच्या पान दुकानाची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली व तेव्हापासून आपल्या ताब्यातच पान दुकान ठेवले. यामुळे मुल्ला कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने आज सकाळी मुल्ला यांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणाचा तपास गुंडाविरोधी पथकाकडे देण्यात आला. आज सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व त्यांच्या पथकाने पाटील यास तुंग येथे अटक केली. सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. (प्रतिनिधी)