शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटांप्रकरणी एसटीएसचे पथक सांगलीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:29 IST

सांगली शहर पोलिसांनी छडा लावलेल्या बनावट नोटांची पाळेमुळे पश्चिम बंगालपर्यंत असल्याने याचा छडा लावण्यासाठी दहशतवादविरोधी (एटीएस) पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले.

ठळक मुद्देबनावट नोटांप्रकरणी एसटीएसचे पथक सांगलीत दाखलपश्चिम बंगालपर्यंतची पाळेमुळे खणून काढण्याचे प्रयत्न

सांगली : शहर पोलिसांनी छडा लावलेल्या बनावट नोटांची पाळेमुळे पश्चिम बंगालपर्यंत असल्याने याचा छडा लावण्यासाठी दहशतवादविरोधी (एटीएस) पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले. या पथकाच्या मदतीने संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुुरु आहे. पथकाने जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडून तपासाची सर्व माहिती घेतली.पंधरा दिवसापूर्वी शहर बनावट नोटांप्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने राज सिंह (वय २८), प्रेमविष्णू राफा (२६), नरेंद्र ठाकूर (३३), सूरज ऊर्फ मनीष ठाकुरी (३६) व जिलानी शेख (४७) यांना अटक केली. हे सर्वजण कल्याण आणि नवी मुंबईतील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून दोन हजारच्या तब्बल १२३ बनावट नोटा जप्त केल्या. त्यांनी राज्यभरात तब्बल पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

चौकशीत रॅकेटचे मुख्य केंद्र पश्चिम बंगाल असल्याचे निष्पन्न झाले. टोळीतील मासे सांगलीत पोलिसांच्या गळाला लागल्याचे समजातच मोहरे सावध झाले. त्यांचे मोबाईल बंद झाले. त्यामुळे पोलिसांचा तपासच थांबला आहे. तरीही पोलीस तांत्रिक पद्धतीने तपास करीत आहेत.तपासाची दिशा पश्चिम बंगलाकडे वळली. पण तिथे जाऊन तपास करणे, हे तितके सोपे नाही. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या तपासात एसटीएसची मदत घेणार असल्याचे दोन दिवसापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार एटीएसचे पाच जणांचे पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले.

पथकाने पोलीसप्रमुख शर्मा यांची भेट घेतली. त्यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. तसेच शहर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी गणेश शिंदे यांच्याकडून आतापर्यंत झालेला तपास? पुढे कशाप्रकारे तपास करावा लागेल? पश्चिम बंगालमध्ये ही टोळीे कशाप्रकारे कार्यरत आहे? याची माहिती घेतली. सायंकाळी हे पथक मुंबईला रवाना झाले.राज्यभर टोळी सक्रियदोन हजाराचा बनावट नोटा चलनात आणणारी ही टोळी राज्यभर सक्रिय होती. राज्यातील अनेक शहरात त्यांनी या नोटा सहजपणे चलनात आणल्या आहेत. ही टोळी पश्चिम बंगलमधील टोळीच्या संपर्कात कशी आली? त्यांचे राज्यात आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा छडा लाऊन संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. तपास थांबला तर आणखी काही दिवसानंतर टोळीचा पुन्हा उद्योग सुरु राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसSangliसांगलीPoliceपोलिसNote Banनोटाबंदी