चोरोची येथे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे समर्थक राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्ता मिळविली हाेती. येथे सरपंचपदी रावसाहेब पाटील, तर उपसरपंचपदी हारुबाई यमगर यांची निवड झाली आहे. इरळी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने पाच जागा जिंकून सत्ता हस्तगत केली. येथील सरपंचपदी संजना आठवले तर उपसरपंचपदी आबासाहेब खांडेकर यांची निवड झाली.
जांभुळवाडी येथे राष्ट्रवादीची सत्ता कायम असून सरपंचपदी सुजाता दाईंगडे, तर उपसरपंचपदी चंद्राबाई सरक यांची निवड झाली आहे.
नांगोळेमध्ये संजयकाका समर्थक बाजार समितीचे सभापती दादासाहेब कोळेकर यांनी गावावरील पकड कायम राखली आहे. येथे सरपंचपदी छायाताई कोळेकर व उपसरपंचपदी वसंतराव हुबाले यांची निवड झाली आहे. म्हैसाळ (एम) येथे राष्ट्रवादीने घोरपडे गटाकडून सत्ता काढून घेतली. येथील सरपंचपदी शहाजी एडके आणि उपसरपंचपदी रोहिणी पाटील यांची निवड झाली.
रायवाडीमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि राष्ट्रवादीचे पांडुरंग कोळेकर यांनी संयुक्त पॅनेल उभे केले होते. पॅनेलविरोधात राष्ट्रवादीने पॅनेल उभे केले हाेते. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या, तर दोन अपक्ष निवडून आले. येथील सरपंचपदी विश्वनाथ दुधाळ, उपसरपंचपदी विश्वास साबळे यांची निवड झाली.
निमजमध्ये चुरशीच्या लढतीत संजयकाका पाटील गटाला सातपैकी पाच जागा मिळाल्या. येथील सरपंचपदी आशा नितीन अमोने, उपसरपंचपदी छाया रुपनर यांची निवड झाली आहे. घाटमाथ्यावरील तिसंगी येथे राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली आहे. तेथील सरपंचपदी रोहिणी सावळे, तर उपसरपंचपदी सिंधुताई पोळ यांची निवड झाली आहे. बनेवाडी येथे राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या संयुक्त पॅनेलने सत्ता मिळविली आहे. येथे सरपंचपदी वैशाली माळी, तर उपसरपंचपदी अश्विनी जगताप यांची निवड झाली आहे.
मोघमवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तायाका ठेंगील, तर उपसरपंचपदी सुशाबाई माने यांची निवड झाली आहे. येथेही राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली. आहे. थबडेवाडी येथे राष्ट्रवादीविरुद्ध माजी मंत्री अजितराव घोरपडे असा सामना झाला. येथे माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला सहा जागा मिळाल्याने सत्तांतर झाले. सरपंचपदी लता खोत, तर उपसरपंचपदी संदेश खोत यांची निवड झाली.
फाेटाे : १० केएम १
ओळ : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील सरपंचपदी छायाताई दादासाहेब कोळेकर यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, गब्बरसिंग गारळे यांनी त्यांचा सत्कार केला.