शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
4
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
5
मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
6
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
7
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
8
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
9
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
10
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
11
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
12
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
13
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
14
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
15
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
16
देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
17
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
18
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
19
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
20
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायपोर्टवरून नेत्यांत जुंपली संजयकाका पाटील : प्रकाश शेंडगे अडगळीत पडलेले नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:16 IST

सांगली : रांजणी येथील जागा हडप करण्याचा प्रकाश शेंडगे यांनी माझ्यावर केलेला आरोप

ठळक मुद्देलोकांचा आर्थिक विकास होण्यास मदत होणार गरज यावरून जागा निश्चितीबाबत शासन निर्णय घेणार आहे.

सांगली : रांजणी येथील जागा हडप करण्याचा प्रकाश शेंडगे यांनी माझ्यावर केलेला आरोप प्रसिद्धीपोटीचा आहे. ते अडगळीत पडलेले नेते आहेत. त्यांची फार दखल घ्यावीशी वाटत नाही, असा पलटवार खासदार संजय पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ड्रायपोर्टच्या रांजणीतील प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेवरून या दोन्ही नेत्यांमध्ये आता जुंपली आहे.

रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे बावीसशे एकर जमिनीवर शेळी-मेंढी संशोधन केंद्र सुरू केले आहे. या संशोधन केंद्राची जागा ड्रायपोर्टच्या नावाखाली हडप करण्याचा डाव संजयकाकांनी आखला आहे, अशी टीका जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी केली होती. त्याविषयी पाटील म्हणाले की, ड्रायपोर्टसाठी रांजणीतील जागा सुचविली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग उपलब्ध असल्यामुळे हे ठिकाण निवडले आहे.

मात्र रांजणीमधील कोणती जागा पोर्टसाठी निवडायची, हे शासन ठरवणार आहे. अहिल्यादेवी शेळी-मेंढी पालन केंद्राच्या जागेसह गायरान जागाही याठिकाणी उपलब्ध आहे. जागांची पाहणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे प्रतिनिधी येणार आहेत. सध्या उपलब्ध जागांचा वापर आणि पोर्टसाठीची गरज यावरून जागा निश्चितीबाबत शासन निर्णय घेणार आहे.

पोर्टच्या माध्यमातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही. उलट पोर्टमुळे दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्हा व परिसरातील डाळिंब, द्राक्ष, साखर यासह इतर उत्पादनांची निर्यात करण्याचा दृष्टिकोन आहे. ड्रायपोर्टमुळे स्थानिक लोकांचा आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यात कुणीही राजकारण आणू नये. प्रसिद्धीपोटी असे आरोप शेंडगे करीत आहेत, असे पाटील म्हणाले.ड्रायपोर्ट बनणार : कळीचा मुद्दाड्रायपोर्टच्या जागेवरून सध्या भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि प्रकाश शेंडगे यांच्यात जुंपली आहे. ही जागा जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील संघर्षात कळीचा मुद्दा बनण्याची चिन्हे दिसत आहेत.