शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

संजयकाका, एकदाचं सांगून टाकाच..! कारण -राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:01 IST

... अखेर म्हैसाळ आणि ताकारी योजनेचं पाणी पाटात पडलं. पाणी सोडण्याचा प्रश्न प्रतिष्ठेचा केलेल्यांचं, त्यावर

श्रीनिवास नागे... अखेर म्हैसाळ आणि ताकारी योजनेचं पाणी पाटात पडलं. पाणी सोडण्याचा प्रश्न प्रतिष्ठेचा केलेल्यांचं, त्यावर राजकारण तापवणाऱ्यांचं, पोळी भाजून घेणाºयांचं आणि तिकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलेल्यांचंही फावलं. आमच्यामुळंच ही योजना सुरू झाली, हे सांगणाºयांची कमी नाही, पण ज्या पक्षाचे खासदार यासाठी मेहनत घेत होते, त्याच पक्षाचे म्हणजे सत्ताधारी भाजपचे काही नेते म्हणे योजनाच बंद रहावी, यासाठी प्रयत्न करत होते! या नेत्यांचा दांभिक चेहराही त्यानिमित्तानं पुढं आला. अर्थात तो सर्वांसमोर उघडा करण्याचं खासदारांनी टाळलंय...

मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत, पलूस-कडेगाव, खानापूर तालुक्यांतली पिकं मान टाकायला लागली होती, बागा हातातून चालल्या होत्या, विहिरी-तळ्यांच्या पाण्यानं तळ गाठला होता. ताकारी-म्हैसाळ सिंचन योजना सुरू होणं गरजेचं होतं. जानेवारीपासून पाण्यासाठी टाहो सुरू होता. ‘म्हैसाळ’च्या कार्यक्षेत्रातील स्थिती बिकट होती. त्या पाण्यासाठी तर दातांच्या कण्या कराव्या लागल्या. मिनतवाºया झाल्या, निवेदनं दिली, मंत्र्यां-संत्र्यांच्या भेटी झाल्या, आंदोलनं झाली, मोर्चे निघाले... पण पाणी काही सुटत नव्हतं. वीजबिलाचा प्रश्न आ वासून उभा होता. थकीत वीजबील कुणी भरायचं, असा सवाल होता. ते सरकारनं टंचाई निधीतून भरावं (कारण काँग्रेस आघाडी सरकारच्या काळापासून तेच चालत आलेलं) असं मत पुढं येत होतं. शेतकºयांना आशा होती. विरोधकच नव्हे तर सत्ताधारी भाजपची मंडळीही (खासगीत हं) तसंच सांगत होती. पण सरकार बधत नव्हतं.

सांगली जिल्ह्याच्या निम्म्या भागाचं राजकारण पाण्याभोवती फिरतं. हे ज्यांना पक्कं ठावूक आहे, ते विद्यमान खासदार संजयकाका पाटील मात्र लगेच पुढं सरसावले. त्यांच्यासोबत राष्टÑवादीच्या आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद-पंचायत समितीचे आजी-माजी सदस्यही होते. काकांनी ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्न प्रतिष्ठेचाच बनवला. पुढं लोकसभा निवडणुका आहेत, त्यात भाजपमधल्या स्वत:च्या हितचिंतकांची संख्या वाढतेय, त्यामुळं काका सजग झाले. या दरम्यान मिरज, कवठेमहांकाळ इथल्या काँग्रेस-राष्टÑवादीसह इतर पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही आक्रमक रेटा लावला.टंचाईची भीषणता अधिक जाणवणाºया मिरज परिसरातल्या नेत्यांचा जोर जरा जादाच होता. त्याचं कारणही तसंच होतं. मिरजेचे स्वयंभू आमदार सुरेश खाडे पाणी सोडण्याच्या प्रयत्नांमध्ये कुठंच दिसत नव्हते. परिणामी ते काँग्रेस-राष्टÑवादीच्या ‘टार्गेट’वर आले नसते तरच नवल! ‘मनी-मसल पॉवर’वर आधी जत आणि नंतर मिरज विधानसभा मतदारसंघाचं मैदान मारणाºया आणि मूळचे उद्योजक असलेल्या खाडेंच्या नसानसात देण्या-घेण्याची व्यावसायिकता भिनलीय. त्यातच आमदारकीच्या तीन टर्म पूर्ण केल्यात. त्यामुळं बेफिकीरीकडं झुकणारा बेमुर्वतपणा कधीच आलाय. पक्षातल्या स्थानिक नेत्यांशी त्यांचं कधी पटतच नाही. (मकरंद देशपांडेंना विचारा!) खासदार संजयकाकांशी तर आधीपासूनच बेबनाव. त्यामुळं पाणी सोडण्याच्या प्रयत्नात संजयकाकांची मेहनत जादा, तर खाडेंची शून्य असल्याचं खुद्द काँग्रेस-राष्टÑवादीची मंडळी सांगत होती.

यादरम्यान संजयकाका नेहमीच चर्चेत राहिले. मंत्र्यांशी भेटी, प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा यात ते पुढं होते. पाणी तापत होतं...मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर दि. १० किंवा ११ मार्चला ‘म्हैसाळ’चं पाणी सुटेल, तसे आदेश दिल्याचं संजयकाकांनी ७ मार्चला जाहीर केलं. मात्र १२ मार्चपर्यंत आदेशच नव्हते. त्याच दिवशी रात्री जिल्ह्यातल्या सिंचन योजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी ५० कोटीचा निधी देऊन त्या कागदपत्रांवर सही केल्याचं संजयकाकांनी थेट मुंबईतून सांगितलं. दोन दिवसात धनादेश वटून पाणी सुटणार, या अपेक्षेत असणाºयांचा भ्रमनिरास झाला. तांत्रिक अडचणींमुळं निधी हस्तांतरित झाला नाही. त्यात तब्बल आठ दिवस गेले. मग संजयकाकांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या स्वनिधीतील ५० कोटी देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर जलसंपदा मंत्र्यांनी २५ कोटी देण्याची तयारी दाखवली. पण पुन्हा आडकाठी घालण्यात आली. अखेर संजयकाकांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आणि निधी मिळाला, पण तोही १५ कोटीचा!संजयकाकांनी राजीनाम्याची धमकी दिल्याच्या बातम्या येत असतानाच सुरेश खाडेंनीही राजीनामा देण्याचा इशारा दिल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या. अर्थात दोन्ही बातम्या स्वतंत्रपणे प्रसारमाध्यमांपर्यंत आल्या. शनिवारी ‘म्हैसाळ’च्या पंपहाऊसमध्ये कळ दाबतानाही संजयकाका आणि खाडेंतील बेबनाव दिसला. तिथं खाडेंचे समर्थक असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर भोसले आणि संजयकाकांचे समर्थक अनिल आमटवणे (हे काँग्रेसचे नेते आहेत, बरं का!) यांनी एकमेकांची गळपट्टी धरली!

संजयकाकांनी पंपहाऊसची कळ दाबली, पण त्याचवेळी भाजपची कळ काढली! एक नेता हीन दर्जाचं राजकारण करत होता, ही योजना बंदच रहावी यासाठी तो प्रयत्न करत होता, असं त्यांनी जाहीर केलं. अर्थात त्याचं नाव मात्र त्यांनी घेतलं नाही.जाता-जाता : म्हैसाळ योजनेच्या पाण्याचं महाभारत घडत असताना संजयकाका आणि खाडेंतील बेबनाव अधोरेखित होत होता. त्यातच माजी मंत्री, कवठेमहांकाळचे पाणीदार नेते अजितराव घोरपडेही पुढं आले. यात राजकारण करू नका, असं सुनावत त्यांनी योजना नीटपणानं चालवण्याचे धडेही दिले. त्यांचं आणि संजयकाकांचं विळ्या-भोपळ्याचं सख्य असल्यानं, काकांना त्यांचे विचार कितपत रूचले, हा प्रश्न आलाच. त्यामुळं आता प्रश्न पडतो की, संजयकाका म्हणतात तो हीन दर्जाचं राजकारण करणारा नेता कोण..?

ताजा कलम : संजयकाका आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख यांचं चांगलंच फाटलंय. अलीकडं काकांना मुख्यमंत्र्यांचा, तर बाबांना चंद्रकांतदादा पाटलांचा वरदहस्त लाभलाय. त्यातूनच म्हणे चंद्रकांतदादांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सूत्रं संजयकाकांकडं न देता त्यांना बाजूला केलंय. त्यात चंद्रकांतदादा तर महसूलमंत्री. सिंचन योजनांचं पाणी सुटावं, यासाठी निधी देण्यासाठी त्यांच्याच विभागाची कळीची भूमिका ठरली...मग आता सांगा, की तो नेता कोण? स जयकाकांनी सांगून टाकावंच...!