शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची चारवेळा राष्ट्रीय पदक विजेती राबतेय रोजंदारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 17:30 IST

Corona Virus sangli : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत चारवेळा पदके मिळवलेली सांगलीची महिला कुस्तीगीर संजना बागडी सध्या ऊसाच्या शेतात राबत आहे. मैदाने बंद झाल्याने आर्थिक कोंडी झाली, त्यामुळे कुस्तीच्या मॅटवरुन काळ्या रानात रोजंदारीवर घाम गाळावा लागत आहे. कुस्तीपंढरी असणाऱ्या सांगली, कोल्हापुरच्या मातीचे दातृत्व कोठे हरवले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देचारवेळा राष्ट्रीय पदक विजेती रोजंदारीवर सांगलीची संजना बागडी राबतेय ऊसाच्या शेतात

संतोष भिसेसांगली : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत चारवेळा पदके मिळवलेली सांगलीची महिला कुस्तीगीर संजना बागडी सध्या ऊसाच्या शेतात राबत आहे. मैदाने बंद झाल्याने आर्थिक कोंडी झाली, त्यामुळे कुस्तीच्या मॅटवरुन काळ्या रानात रोजंदारीवर घाम गाळावा लागत आहे. कुस्तीपंढरी असणाऱ्या सांगली, कोल्हापुरच्या मातीचे दातृत्व कोठे हरवले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.महिला कुस्ती क्षेत्रात आघाडीची युवा कु्स्तीगीर म्हणून संजनाने नाव कमवले आहे. कतृर्त्वाने सिद्धही केले आहे. दिल्ली, पुणे, पाटणा, बेल्लारी येथील राष्ट्रीय स्पर्धांत पदके पटकावली आहेत. कोरोनाविरुद्धच्या मैदानात मात्र सपशेल माघार घ्यावी लागली आहे. देशभरातील स्पर्धा रद्द झाल्या. गावोगावच्या यात्रा व मैदाने रद्द झाली, त्यामुळे आर्थिक स्त्रोत थांबला. स्पर्धेतील मानधन व बक्षिसातून आहाराचा, सरावाचा खर्च निघायचा. पण लॉकडाऊनमुळे जणू तिची कारकीर्दच लॉक झाली आहे.सांगलीजवळच्या तुंग (ता. मिरज) येथे संजना राहते. वडील खंडू कृष्णेत मासेमारी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. बारावीत शिकणारी संजना कुस्तीच्या बक्षिसांमधून स्वत:चा खर्च चालवते, वडीलांवर भार टाकत नाही. सध्या लॉकडाऊनमुळे मात्र पर्याय राहीला नाही. राष्ट्रीय खेळाडूचा सराव आणि आहाराचा महिन्याचा खर्च ५० ते ७० हजारांच्या घरात जातो. संजनाला मात्र मुरड घालून पाच-सात हजारांतच भागवावा लागत आहे.

कृष्णेची पातळी वाढल्याने वडीलांची मासेमारी थांबली आहे, पण संजनाचा खर्च तर थांबणारा नाही, त्यामुळे ती शेतात रोजंदारीवर राबायला जात आहे. ऊसासाठी सरी सोडणे, वाफे तयार करणे, पाण्यासाठी दारे तयार करणे अशी कामे करत आहे. सहा ते आठ तासांच्या कामासाठी ३०० रुपयांपर्यंत मजुरी मिळते, त्यातून स्वत:चा आणि काही प्रमाणात घरचाही खर्च निघतो.मैदाने बंद असली तरी संजनाने सराव थांबविलेला नाही. सकाळी घरात दोरीवरचे व्यायाम, पोहणे आदीच्या माध्यमातून तंदुरुस्ती राखते. संध्याकाळी कवलापुरला उत्तमराव पाटील यांच्या कुस्ती केंद्रात वडील घेऊन जातात.सांगलीकरांनो, कोठे गेले तुमचे दातृत्व?संजनासारख्या प्रतिभावंत राष्ट्रीय कुस्तीगीराला खर्चासाठी शेतात रोजंदारीवर राबण्याची वेळ आल्याने सांगलीकरांच्या दातृत्वावर प्रश्न निर्माण झाले आहेत. कुस्तीला लोकाश्रयाचा बडेजाव मिरवणाऱ्या साखर कारखानदारांची भाषाही पोकळच असल्याचे सिद्ध होत आहे. चारवेळा राष्ट्रीय पदके मिळवल्यानंतर तिने आणखी कशी गुणवत्ता सिद्ध करायला हवी? असाही प्रश्न आहे. मैदान मारल्यावर डोक्यावर घेऊन नाचणारे सांगलीकर लॉकडाऊनमध्ये मात्र ती आमच्या गावची नाहीच या कोत्या भूमिकेत वावरत आहेत.

मैदाने बंद असल्याने सराव आणि उत्पन्न दोन्ही थांबले आहे. खर्च चालवण्यासाठी शेतात घाम गाळण्याशिवाय पर्याय नव्हता. कामाच्या निमित्ताने शारिरीक मेहनतही होते.- संजना बागडी,युवा महिला कुस्तीगीर

टॅग्स :Wrestlingकुस्तीSangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी