शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गणरायाचे जल्लोषी स्वागत बाजारपेठांत गर्दी : गणपती बाप्पा मोरयाऽऽऽचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:39 IST

भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात

सांगली : भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात गणरायाच्या सांगली नगरीत गुरुवारी बाप्पांचे जल्लोषी आगमन झाले.

लाडक्या देवाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांची गेल्या कित्येक दिवसांपासून स्वागताची तयारी सुरू होती. उत्साही लाटेवर स्वार होत भाविकांनी गुरुवारी गणरायाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पहाटेपासूनच घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती. त्यामुळे सकाळी सातपासूनच बाजार फुलला होता. दिवसभर सांगलीच्या हरभट रस्ता, मारुती रस्ता परिसरात साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. मारुती रस्ता, गावभाग, बसस्थानक परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक याठिकाणी मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती. सवाद्य मिरवणुकांची दिवसभर रेलचेल दिसत होती.

भगव्या-पांढऱ्या टोप्या, शेला, फेटा परिधान करून पारंपरिक पद्धतीने व वाद्यांच्या गजरात गणरायाच्या स्वागताच्या मिरवणुका रंगल्या होत्या. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदा पारंपरिक ढोल-ताशा, लेझिम, झांजपथक अशा वाद्यांना पसंती दिली. सांगली शहर व परिसरात कार्यकर्त्यांची दिवसभर लगबग सुरू होती. प्रतिष्ठापना झाल्यानंतर देखाव्यांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसांत बहुतांश देखावे खुले होण्याची शक्यता आहे. यंदा पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांबरोबर मंदिरांच्या प्रतिकृती, संगीत-रंगीत कारंजे यांचा प्रभाव अधिक आहे.संस्थान गणपतीची प्रतिष्ठापनासांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानच्या मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये थाटात करण्यात आली. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांच्याहस्ते आरती करण्यात आली. यावेळी पौर्णिमा पटवर्धनही उपस्थित होत्या.

टॅग्स :SangliसांगलीGanpati Festivalगणेशोत्सव