शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सांगलीत भाजपचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:56 PM

सांगली : संसदेचे कामकाज चालू न देणाऱ्या विरोधकांचा निषेध करीत भाजपने पुकारलेल्या देशव्यापी उपोषणाचा भाग म्हणून सांगलीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप नेते व कार्यकर्त्यांनी गुरुवारी उपोषण केले.सांगलीच्या विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी याठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला होता. उपोषणावेळी विरोधकांच्या भूमिकेचा निषेधही भाजप कार्यकर्त्यांनी केला. ...

सांगली : संसदेचे कामकाज चालू न देणाऱ्या विरोधकांचा निषेध करीत भाजपने पुकारलेल्या देशव्यापी उपोषणाचा भाग म्हणून सांगलीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप नेते व कार्यकर्त्यांनी गुरुवारी उपोषण केले.सांगलीच्या विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी याठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला होता. उपोषणावेळी विरोधकांच्या भूमिकेचा निषेधही भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस व इतर सर्वच विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. सातत्याने सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यात आले. लोकसभेचे जेमतेम ४३ तास, तर राज्यसभेचे ४५ तास कामकाज होऊ शकले. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे २४८ तास वाया गेले. त्यामुळे देशभरातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय होऊ शकलेले नाहीत. विकास कामांना खो घालणाºया या विरोधकांना आता जनताच उत्तर देईल. लोकशाहीच्या विरोधात कृती होत असताना आत्मक्लेश म्हणून आम्ही एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत. जनतेला विरोधकांचे खरे रुप आता कळाले आहे. त्यांच्यामुळेच विकासाला खीळ बसत असल्याचे चित्र आहे. भाजपने प्रामणिकपणे जनहिताच्या निर्णयासाठी प्रयत्न केले आहेत, असे पाटील म्हणाले.आमदार सुधीर गाडगीळ, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, दिनकर पाटील, शेखर इनामदार, युवा मोर्चाचे अध्यक्ष व स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर, दीपकबाबा शिंदे, वैभव शिंदे, मुन्नाभाई कुरणे, इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती अरुण राजमाने, शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, भारती दिगडे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे आदींसह भाजपचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपोषणाला बसले होते.संजयकाकांचे उपोषण : पाचवी वेळसंजयकाका पाटील यांनी उपोषण करण्याची त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील ही पाचवी वेळ ठरली आहे. कॉँग्रेस, राष्टÑवादी, स्थानिक विकास आघाडी अशा विविध पक्ष, संघटनांच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर यापूर्वी त्यांनी चारवेळा उपोषण केले होते. यापूर्वी विरोधी पक्षाच्या भूमिकेतून त्यांनी आंदोलन केले होते. सत्ताधारी पक्षात असूनही उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर प्रथमच आली.