शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तरुणाची आत्महत्या, रेल्वे रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसला, रूळ ओलांडताना वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 11:49 IST

सांगली येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेची धडक बसल्याने एका महिलेसह दोघेजण ठार झाले. विश्रामबाग रेल्वे फाटक ते स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी या घटना घडल्या. मंगल रघुनाथ बेंद्रेकर (वय ५२, रा. कृष्णाली वसाहत, विश्रामबाग) व शशिकांत आनंदराव साळुंखे (२५, कांचनपूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.

ठळक मुद्देसांगलीत रेल्वेच्या धडकेत दोन ठार वेगवेगळ्या घटना तरुणाची आत्महत्या, रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसलायशवंतपूर-जोधपूर रेल्वेची त्यांना जोराची धडक, रूळ ओलांडताना वृद्धेचा मृत्यूहद्दीचा वाद : मृतदेह पाच तास स्थानकावर

सांगली : येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेची धडक बसल्याने एका महिलेसह दोघेजण ठार झाले. विश्रामबाग रेल्वे फाटक ते स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी या घटना घडल्या. मंगल रघुनाथ बेंद्रेकर (वय ५२, रा. कृष्णाली वसाहत, विश्रामबाग) व शशिकांत आनंदराव साळुंखे (२५, कांचनपूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.मंगल बेंद्रेकर या सकाळी अकरा वाजता विश्रामबाग रेल्वे फाटकाजवळील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या पावणेबारा वाजता घरी निघाल्या होत्या. त्यावेळी यशवंतपूर-जोधपूर रेल्वे जाणार असल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. तरीही त्यांनी फाटक ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला.

याचदरम्यान भरधाव वेगाने आलेल्या यशवंतपूर-जोधपूर रेल्वेची त्यांना जोराची धडक बसली. यामध्ये त्या उडून पडल्याने जागीच ठार झाल्या. मिरज रेल्वे पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. बेंद्रेकर यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शशिकांत साळुंखे हा मिरज एमआयडीसीतील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत होता. गेले दोन दिवस तो कामावरही गेला नाही, तसेच घरीही गेला होता. त्यामुळे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. सकाळी साडेआठ वाजता तो विश्रामबाग स्थानकावर फिरत होता. 

यावेळी पुणे-मिरज ही मालवाहतूक रेल्वे येताना त्याला दिसताच तो रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसला. चालकाने हॉर्न वाजवून त्याला हटविण्याचा प्रयत्न केला. तरीही तो उठला नाही. शेवटी त्याला रेल्वेची जोरात धडक बसली. तो उडून रुळाकडेला पडला. नागरिकांनी धाव घेतली व त्याला पाणी पाजले. पण काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.हद्दीचा वाद : मृतदेह पाच तास स्थानकावररेल्वेची धडक बसल्यानंतर शशिकांत साळुंखे जिवंत होता. नागरिकांनी त्याला उचलून प्लॅटफार्मवर ठेवले. पण पाणी पाजताच त्याचा मृत्यू झाला. ही घटना रेल्वेच्या हद्दीत होती. परंतु रेल्वे पोलिसांनी हात झटकले. यावरुन रेल्वे व विश्रामबाग पोलिसांत जोरदार वाद झाला. या वादामुळे मृतदेच पाच तास स्थानकावर पडून होता. शेवटी विश्रामबाग पोलिसांनी पंचनामा करुन पुढील कार्यवाही केली.

टॅग्स :SangliसांगलीRailway Passengerरेल्वे प्रवासीAccidentअपघात